Full Width(True/False)

‘फास्ट अँड फ्युरिअस’ला ब्रेक लागणार; सीरिज होणार बंद

मुंबई: सुसाट धावणाऱ्या एकापेक्षा एक स्पोर्ट्स कार्स, त्याबरोबर धमाकेदार अ‍ॅक्शन दृश्यं असलेल्या हॉलिवूडच्या '' सिनेमाच्या सीरिजचं लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना वेड आहे. जगभरात या सरिजचे कित्येक चाहते आहेत. आता या सीरिजच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. यूनिव्हर्सल पिक्चर्सनं ही सीरीज बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 'फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस' सिनेमांची सीरिज ११व्या सिनेमानंतर बंद केली जाणार आहे. असंही सांगितले जात आहे की, या सिनेमाच्या शेवटच्या दोन भागांचं दिग्दर्शन करणार आहे. '' हा चित्रपट सध्याच्या करोना संकटाच्या परिस्थितीमुळे पुढील वर्षी, म्हणजेच २०२१ मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. जस्टिन लिननं आतापर्यंत या सीरिजच्या चार सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. इतर देशांप्रमाणे भारतातही या सीरिजचे कोट्यवधी चाहते आहेत. दिग्दर्शक जस्टिन लिननं याआधी या सीरिजच्या 'फास्ट अ‍ॅन्ड फ्यूरिअस: टोकियो ड्रिफ्ट', 'फास्ट अ‍ॅन्ड फ्यूरिअस फाइव्ह (एफ ५)' आणि 'फास्ट अ‍ॅन्ड फ्युरिअस ६'च सुद्धा दिग्दर्शन केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37RRqOn