नवी दिल्लीः पोकोने भारतात आज आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. पोकोचा हा फोन ३ जीबी प्लस ३२ जीबी आणि ४ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या ३ जीबी रॅमच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आणि ४ जीबी रॅम फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Poco C3 मध्ये 5000mAh बॅटरी आणि १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा यासारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः Poco C3 चे वैशिष्ट्ये फोनमध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. डार्क मोड असल्याने डिस्प्ले जबरदस्त वाटतो. तसेच हे बॅटरी वाचवण्याचे काम करतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर दिला आहे. फोनचा स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने ५१२ जीबीपर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी खास Better Battery 2.0 टेक्नोलॉजी सोबत येते. बॅटरी सेविंग करण्यासाठी यात खास मोड दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की, बॅटरीची पॉवर ३.२ वर्षापर्यंत सुरू राहिल. हा फोन MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jzvDhD