नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंगकडून भारतात आपली नवीन Galaxy F Series लाँच करण्यात आली आहे. सीरीजमधील पहिला फोन गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ऑनलाइन ओन्ली ग्रँड इव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमती १६ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. वाचाः Galaxy F41 ची किंमत कंपनीने या फोनला दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये आणले आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजची किंमत १६ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोनला तीन कलर मध्ये फ्यूजन ग्रीन, फ्यूजन ब्लॅक आणि फ्यूजन ब्लू मध्ये खरेदी करता येवू शकते. या फोनच्या सेलसाठी फ्लिपकार्टसोबत पार्टनरशीप करण्यात आली आहे. ऑफिशल ऑनलाइन स्टोर शिवाय फ्लिपकार्ट वर बिग बिलियन डेज सेल १६ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर १५०० रुपयांच्या डिस्काउंटमध्ये हा फोन खरेदी करता येवू शकतो. वाचाः फोनची वैशिष्ट्ये या फोनमध्ये ६.४ इंचाचा sAMOLED Infinity-U डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल्स आहे. फोनमध्ये Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. यात ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकतो. फोनमध्ये रियर पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. मॉड्यूल मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात मोठी 6000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dafblk