Full Width(True/False)

Whatsapp मध्ये आले जबरदस्त नवीन फीचर्स, तात्काळ अपडेट करा अॅप

नवी दिल्लीः प्रसिद्ध मेसेजिंग सर्विस ने आपल्या अॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. अनेक फीचर्स सोबत नवीन इमोजी सुद्धा यात आले आहेत. जर तुम्हाला आतापर्यंत नवीन फीचर्स किंवा इमोजी मिळाली नसतील तर तात्काळा अॅप अपडेट करा. व्हॉट्सअॅप या फीचर्सला खूप दिवसांपासून आपल्या अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट करीत होती. आता सर्व युजर्संसाठी हे स्टेबल अॅप मध्ये ही फीचर रोलआउट करण्यात आले आहे. तसेच अॅडवान्स्ड सर्चचे ऑप्शन युजर्सला अॅपमध्ये मिळत आहे. काही युजर्संना त्याच्या फोनमध्ये नवीन फीचरसाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. वाचाः Whatsapp अॅडवान्स्ड सर्च अॅप अपडेट केल्यानंतर तुम्ही सर्च आयकॉनवर टॅप कराल त्यावेळी तुम्हाला बदल दिसेल. व्हॉट्सअॅप युजर्संना सहज फोटो, व्हिडिओ, ऑडियो, जीफ फाईल आणि डॉक्यूमेंट्स सर्च करता येणार आहे. म्हणजेच मेसेजेस शिवाय मीडिया फाईल्स सर्च करणे सोपे झाले आहे. आधी युजर्संना मीडिया फाइल्स आणि टेक्स्ट साठी सिंगल सर्च ऑप्शन मिळत होता. आता फाईल शोधण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. नवीन ऑप्शनमधून मेसेज किंवा फाईल युजर्संना शोधायचे असल्यास त्याला सिलेक्ट करून सर्च करता येवू शकते. वाचाः असे काम करणार नवीन फीचर सर्वात आधी हे अपडेट करावे लागणार आहे. त्यानंतर Whatsapp ओपन करावे. या ठिकाणी उजव्या बाजुला टॉपला कॉर्नरवर दिसत असलेले सर्च आयकॉनवर टॅप करताच सहा ऑप्शन दिसतील. या ठिकाणी फोटो, व्हिडिओ, लिंक्स, जीफ, ऑडियो आणि डॉक्यूमेंट्स आहे. आता जर तुम्हाला फोटो सर्च करायचा असेल तर त्यावर टॅप करा. त्यानंतर सर्च टर्म लिहा. त्या संबंधित फोटो दिसतील. त्याप्रमाणे डॉक्यूमेंट सर्च करा. त्यावर टॅप केल्यानंतर त्याचे नाव टाइप करा. त्यानंतर डॉक्यूमेंट्स समोर दिसतील. वाचाः खूप सारे नवीन इमोजी मिळणार अडवॉन्स्ड सर्चचे ऑप्शन युजर्ससाठी मेसेजेस आणि मीडिया फाइल्सला फिल्टर करते. उदाहरणासाठी व्हिडिओवर टॅप केल्यानंतर सर्च रिझल्ट्स मध्ये केवळ व्हिडिओ दिसतील. या प्रमाणे अडवॉन्स्ड फीचर शिवाय व्हटॉट्सअॅपच्या आयकॉन पॅकमध्ये खूप सारे नवीन इमोजीचा समावेश आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये समोर आलेल्या अॅपमध्ये युजर्संला १३८ नवीन इमोजी दिले जाणार आहे. अॅपमध्ये आलेल्या नवीन इमोजी मध्ये व्हीलचेयरवर बसलेले लोक, कृत्रिम हात, टेंपल, नवीन क्लोदिंग, ऑटो, स्कंक यासारखे प्राणी, योग करताना लोक, LGBTQ कपल्स आणि अन्य साइन लँग्वेज सिम्बॉल्सचा समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lqxyp8