सुरज कांबळे कलाकारांचा इंडस्ट्रीतला प्रवास हा कधीच सोपा नसतो. प्रत्येक कलाकारासाठी संघर्ष अटळ आहे. झगमगत्या दुनियेत आपला प्रवास सुरू करण्याअगोदर अनेक कलाकार काही छोट्या-मोठ्या भूमिका करत आपलं नशीब आजमावत असतात. त्यापैकी काही चित्रपट आपटतात, तर काही डब्यातच राहतात. आज यशोशिखरावर असलेले काही कलाकार यापूर्वी अपयशी ठरलेल्या चित्रपटांतून किंवा जेमतेम चाललेल्या सिनेमांतून छोट्या-छोट्या भूमिकांतून प्रेक्षकांसमोर आले होते. कतरिना कैफनं केलेल्या 'बूम' या चित्रपटापासून ते श्रध्दा कपूरनं अमिताभ बच्चन आणि बेन किंग्जले यासारख्या बड्या कलाकारांसह केलेल्या 'तीन पत्ती' या चित्रपटाचासुद्धा यामध्ये समावेश आहे. नुसरत भरुचा कार्तिक आर्यनबरोबर 'प्यार का पंचनामा'मध्ये झळकलेली नुसरत भरुचा काही वर्षांपूर्वी एका पौराणिक चित्रपटात दिसली होती. २००६ मध्ये आलेल्या 'जय संतोषी मां' या पौराणिक चित्रपटातून तिचा प्रवास सुरू झाला होता. या चित्रपटात तिनं, खडतर परिस्थितीशी सामना करणारी, अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागणाऱ्या मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. प्रेम आणि न्याय मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नुसरतच्या मदतीला शेवटी देवी येते, असं काहीसं या चित्रपटाचं कथानक होतं. हा चित्रपट तिचा आहे हे कोणालाही आठवत नसेल. तसंच जॅकी भगनानीच्या 'कल किसने देखा' या चित्रपटात ती दिसली होती, तरी ते अनेकांच्या आठवणीत राहिलं नाही. सध्या लाखो तरुणांची आवडती नायिका बनलेल्या या नायिकेच्या मागे अजूनही देवीचा आशीर्वाद आहे असं म्हणावं लागेल. अमित साध अमित साधची सुरुवात आणि त्याला ओळख मिळवून देणारा चित्रपट म्हणजे 'काय पो छे'. याच चित्रपटातून दिवंगत अभिनेता सुशांतशिंग राजपूतनंसुद्धा आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. पण 'फुंक २' या चित्रपटासाठीही अमितनं टेस्ट शूट केलं होतं हे फारच कमी जणांना ठाऊक असेल. तमन्ना भाटिया २०१३ला अजय देवगणसह आणि साजिद खानच्या 'हिंमतवाला'मधून 'तमन्ना'नं आपल्या बॉलिवूड प्रवासाला सुरुवात केली. त्याचबरोबर तिची तुलना श्रीदेवीशी होऊ लागली होती. पण फार कमी लोकांना ठाऊक आहे की वयाच्या पंधराव्या वर्षी तिनं 'चांद सा रोशन चेहरा'पासून सुरुवात केली होती. त्यानंतर ती ८ वर्षं दाक्षिणात्य चित्रपटात रमली होती. फातिमा सना शेख आमिर खानच्या सुपरडुपरहिट 'दंगल'मधील गीताला कुणी विसरू शकणार नाही. सनानं 'दंगलद्य'मधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असं अनेकांना वाटत असेल. पण खरं तर सना याआधी 'आकाशवाणी' या चित्रपटात कार्तिक आणि नुसरत यांच्यासह दिसली होती. 'मसान' या चित्रपटातून अभिनेता विकी कौशलनं केवळ प्रेक्षकांची मनंच जिंकली नाहीत, तर स्वत:ला एक उत्तम अभिनेता म्हणूनही सिद्ध केलं. पण या चित्रपटाच्या आधी हा अभिनेता 'लव शव से चिकन खुराना'मध्ये लहान कुणाल कपूरच्या भूमिकेत दिसला होता. कीर्ती कुल्हारी 'पिंक' या एका वेगळ्या, ज्वलंत विषयावरील चित्रपटातून सगळ्यांना माहीत झालेली कीर्ती कुल्हारी याआधीही एका चित्रपटात दिसली होती. 'पिंक'पूर्वी ती 'खिचडी द मूव्ही'मध्ये एका साध्याभोळ्या पंजाबी मुलीच्या भूमिकेत तिनं काम केलं होतं. राधिका आपटे, ईशान खट्टरशाहिद कपूरच्या 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून राधिका आपल्याला दिसली. 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटात ईशान खट्टर त्याचा पुतण्या म्हणून देखील दिसला होता. आज हे दोघे स्टार सिनेमात प्रमुख भूमिका करताना दिसत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m7sWFb