Full Width(True/False)

प्रणित हाटे ते 'कारभारी लय भारी' मालिकेतील गंगा...एक संघर्षमय प्रवास

मुंबई: मराठी मालिकांमध्ये सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. नवीन कलाकारांना, नवीन चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. नुकत्यात सुरू झालेल्या 'कारभारी लय भारी' मालिकेत देखील काही नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेतील मुख्य कलाकांसोबतच सध्या या पात्राची सध्या चर्चा सुरू आहे. गंगा हे पात्र हे या साठी खास आहे कारण मराठी सिनेसृष्टीतील पहिला ट्रान्सजेंडर कलाकार ही भूमिका साकरतोय. असं या ट्रान्सजेंडर कलाकाराचं नाव आहे. युवा डान्सिंग क्विन या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचान करण्याची मोठी संधी गंगाला मिळाली होती. आता तिनं मालिकेत तिच्या अभिनयाची झलक दाखवण्याची संधी मिळाली आहे. प्रवास होता खडतरप्रणित हाटे ते गंगा हा प्रवास तिनं युवा डान्सिंग क्विनच्या मंचावर उलघडला होता.मुंबईतील विद्या विहार इथं गंगाचं बालपण गेलं. हाटे कुटुंबात पहिल्यांदा मुलगा जन्माला आला होता. पण या मुलाची वर्तवणूक मुलींसारखीच होती. त्यामुळं लहानपणापसूनच तू गंगाला हिणवलं जात होतं. तू बायला आहे,असं मित्रांकडूनही चिडवलं जात होतं. या सर्व गोष्टींचा गंगाला मानसिक त्रास झाला होता. तिनं तिच्या घरच्यांना तिच्याबद्दल सांगून टाकलं. काही काळ त्यांचाही राग गंगानं सहन केला. परंतु नंतर घरच्यांनी तिला समजून घेतलं, तिला पाठिंबा दिला. घरच्यांनी दिल्या या पाठिंब्यामुळं गंगाला सिनेसृष्टीत उडी घेता आली. तिला युवा डान्सिंग क्विन या रिअॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली आणि आता ती कारभारी लयभारी मालिकेत झळकत आहे. गंगाच्या या संघर्षाचं सर्वत्रच कौतुक होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37iVUvM