Full Width(True/False)

सामनाच्या 'उखाड दिया' बातमीने कंगना रणौतला मिळवून दिला विजय?

मुंबई- आज २७ नोव्हेंबर हा कंगना रणौतसाठीचा खूप आनंददायी दिवस आहे. तिने कार्यालय मोडल्याबद्दल बीएमसी विरोधातला खटला जिंकला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात बीएमसीच्या हेतूत दोष असल्याचं मान्य केलं आहे. तसेच त्यात महाराष्ट्र सरकारचा कुठे ना कुठे हात होता असंही म्हटलं. कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी निकाल लागल्यानंतर याबद्दल सविस्तर माहिती दिली. बीएमसीच्या कारवाईनंतर चर्चेत होती बातमीची हेडलाइन कंगना रनौत यांचे वकील रिझवान म्हणाले की, कार्यालय तोडण्याच्या दुसर्‍या दिवशी सामनाच्या एका बातमीची हेडलाइन 'उखाड दिया' अशी होती. पालिकेने नियमावलीनुसार ही प्रक्रिया पार पाडली नाही. इतके पोलीस घेऊन आले आणि दुसर्‍याच दिवशी वृत्तपत्रात या मथळ्याची बातमी आली. यावरूनच संपूर्ण जगाला स्पष्ट झाले की या प्रकरणात कदाचित राज्य सरकारचा हात आहे. हायकोर्टाने याबद्दल बोलताना स्पष्ट केलं की यातलं षडयंत्र नाकारता येणार नाही. न्यायाधीशांनी त्या पैलूकडे दुर्लक्ष केलं नाही आणि आपला योग्य तो निर्णय दिला. किती नुकसान भरपाई मिळेल हे मार्चपर्यंत कळेल त्याचवेळी कंगनाच्या वकिलांनी असेही म्हटलं की नुकसान भरपाईसाठी कोर्टाने व्हॅलुअरची नेमणूक केली आहे. यावेळी बीएमसीही व्हॅल्यूअरशी चर्चा करू शकते. कंगनाकडून दोन कोटींची मागणी करण्यात आली आहे. व्हॅल्यूअरने किती रक्कम निश्चित केली ते मार्चपर्यंत आपल्याला कळेल. कंगना आणि महाराष्ट्र सरकारांमध्ये सुरू झालेली शाब्दिक चकमक कंगनाने मुंबईची तुलना पीओकेशी केली त्यानंतर कंगना आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं. यांनी कंगनाला हरामखोर मुलगीही म्हटलं होतं. या प्रकरणावर कंगना सतत ट्वीट करत होती. यानंतर बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी कंगनाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mcZdL6