Full Width(True/False)

विनयभंग प्रकरण; अभिनेता विजय राज याला चित्रपटातून डच्चू

मुंबई: चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवरील महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. याप्रकरणी दखल घेऊन निर्मात्यांनी देखील याला चित्रपटातून काढून टाकल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी '' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विजय राज यानं ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी पीडितेनं पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा जमीन मंजूर झाला होता..बॉलिवूडमधील सध्याची परिस्थिती पाहाता निर्मात्यांनी देखील चित्रपटावर नकारात्मक छाप पडू नये यासाठी विजयला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. काय आहे नेमकं प्रकरण? विजय राज यानं त्याच्या आगामी 'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान स्टाफमधील ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 'शेरनी' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी चित्रपटातील कलाकार मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात आणि गोंदियातील हॉटेल गेटवे इथं गेल्या काही दिवसांपासून मुक्कामी राहत आहेत. गोंदियातील हॉटेल गेटवे इथं विजय राज यांनी पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेलाय. निर्मात्यांना आर्थिक फटका विजय राज याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विजय राज याच्यावर जास्तीत जास्त दृश्य चित्रीत करण्यात आली होती. ही सर्व दृश्ये आता पुन्हा चित्रीत करावी लागणार आहेत. तब्बल २२ दिवस विजयचं शूटिंग चालणार होतं. दिवसाला जवळपास २० लाखांइतका खर्च शूटिंगसाठी येत असल्यानं आता निर्मात्यांना २ कोटींचा फटका बसणार असल्याचं म्हटलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oZ62Sb