मुंबई- बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्या आणि दिग्दर्शिका यांचा मुलगा यांनी अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत एक वेगळा इतिहास रचला आहे. त्यांनी न्यूयॉर्कच्या राज्य विधानसभेत जागा जिंकली आहे. ही जागा जिंकणारे जोहरान ममदानी हे दक्षिण आशियातील पहिले व्यक्ती ठरले. न्यूयॉर्कच्या ३६ व्या राज्य विधानसभेची जागा अस्टोरिया (क्वींसच्या शेजारी) येथून त्यांची बिनविरोध निवड झाली. स्वत: जोहरान यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वांना दिली. ही आनंदाची बातमी देताना त्यांनी स्वतःचा एक फोटोही शेअर केला. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'आम्ही जिंकलो हे आता अधिकृत आहे. मी श्रीमंत लोकांवर कर आकारण्यासाठी, आजारी लोकांवर उपचार करण्यासाठी, गरीबांना घर देण्यासाठी आणि न्यूयॉर्कमध्ये समाजवादी बांधण्यासाठी अल्बानीला जात आहे. पण मी हे एकटं करू शकत नाही. एका मोठ्या चळवळीची आवश्यकता आहे.' सध्या जोहरन यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याxचे समर्थक आणि सर्व सोशल मीडियाचे यूझर ट्विटवर प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे, युगांडाच्या कंपाला येथे जन्मलेल्या जोहरान यांचं कुटुंब जेव्हा ते सात वर्षांचे होते तेव्हाच न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले होते. २८ वर्षीय जोहरन ममदानी हे रॅपर आणि गृहनिर्माण सल्लागार आहेत. त्यांना नानी हा रॅप व्हिडिओ केला आहे. गृहनिर्माण सल्लागार म्हणून, त्यांनी स्थलांतरित झालेल्यांना मदत केली आहे. त्यांना डाव्या बाजूच्या डेमोक्रॅटिक पार्टी आणि डेमोक्रॅटिक सोशलिस्ट अलायन्सचंही समर्थन मिळालं आहे. एवढंच नाही तर ममदानी लोकांना स्वस्त घरं मिळावी म्हणून जोहरी ‘रोटी अँड रोजेज’ ही मोहीमही राबवत आहेत..
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3p0fzbO