मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणारे एनसीबीचे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अधिकारी आणि त्यांच्या पथकावर काल म्हणजेच मंगळवारी मुंबईतील गोरेगावात हल्ला झाला होता. यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री हिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. समीर यांची तब्येत ठिक असल्याचं क्रांतीनं म्हटलं आहे. त्यांच्याबद्दल विचारपूस करणाऱ्यांचंही तिनं आभार मानले आहेत. तसंच एनसीबीच्या टीमचा अभिमान असल्याचंही क्रांतीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी क्रांतीनं समीर यांचा प्रचंड अभिमान वाटतो, असं सांगितलं होतं. ते प्रथम देशाचे आहेत मग आमचे,असंही क्रांती म्हणाली होती. इतकंच नव्हे तर त्यांची काळजी वाटते पण त्यांना पूर्ण पाठिंबा असून कोणत्याही परिस्थीतीत त्यांना सहकार्य करण्याची तयारी असल्याचंही क्रांती म्हणते. एनसीबीकडून गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्यात येत आहे. नुकतीच विनोदी अभिनेत्री भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना अटक केली आहे. या दोघांनाही मुंबईतील कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. ६० जणांच्या टोळीने केला हल्लावानखेडे आणि त्यांच्या पथकावर जवळपास ६० जणांनी हल्ला चढवल्याची माहिती सूत्रांनी दिली. या हल्ल्यात पथकातील दोन अधिकारी जखमी झाले. एनसीबीचे अधिकारी कॅरी मॅंडिस या ड्रग तस्कराला अटक करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तिथे पोहोचले होते आणि परिस्थिती नियंत्रणात आणून पथकातील अधिकाऱ्यांचा हल्लेखोरांपासून बचाव केला बोता. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2J8Lsy9