Full Width(True/False)

अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सईच्या या विवाहसोहळ्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. सईनं लग्नापूर्वीच्या अनेक विधींचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यामुळं विवाहाचे फोटो पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. बिग बॉसनंतर सई मालिका किंवा चित्रपटात दिसली नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात होती. सईचा लाइफ पार्टनर कोण असेल, याबद्दलही तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. असं सईच्या पतीचं नाव आहे. तिर्थदीप सिनेनिर्माता असल्याची माहिती आहे. पाहा विवाहसोहळ्याचे खास फोटो: दरम्यान, बिग बॉसच्या घरात असताना सईच्या लव्ह लाइफबद्दल तिनं खुलासे केले होते. तसंच पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यात 'कुछ तो गडबड है' अशी चर्चाही रंगली होती. झाली आहे. 'बिग बॉस'च्या घरात दोघांचं चांगलं जमत होतं. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वावरताना दिसलेली. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं, सईच्या मनोरंजनासाठी पुष्करनं आयटम नंबरवर डान्स करणं किंवा जेवणावेळी पुष्करच्या ताटात सईनं जेवण करणं. त्यावर घरातल्या इतर सदस्यांनी 'प्यार बाटने से बढता है' म्हणत दोघांची टर उडवणं. या प्रसंगांतून दोघांमधील मैत्रीचं नातं आता नवीन वळण घेतं की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36ijWr8