Full Width(True/False)

Redmi ची पहिली स्मार्ट वॉच लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः चीनी स्मार्टफ़ोन ची सब ब्रँड कंपनी रेडमी ने पहिल्यांदा स्मार्टवॉच लाँच केली आहे. रेडमीने या स्मार्ट वॉचला सीरीज़ अंतर्गत लाँच केले आहे. वाचाः ची डायल स्क्वॉयर शेप आहे. यात अनेक प्रकारचे फिटनेस फीचर्स दिले आहेत. हे स्मार्ट वॉच बजेट कॅटेगरीची आहे. तसचे यात NFC चा सपोर्ट दिला आहे. Redmi Watch मध्ये १.४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेत ऑटो ब्राईटनेसचा सपोर्ट दिला आहे. यात अनेक प्रकारचे प्री इन्स्टॉल्ड फिटनेस मोड्स दिले आहे. या वॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटर सुद्धा देण्यात आला आहे. Redmi Watch ला Mi Fit अॅप सोबत कनेक्ट करता येवू शकते. यात १२० वॉच फेसचा सपोर्ट दिला आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे यात वॉच फेस सेट करू शकता. वाचाः Redmi Watch च्या फीचर्स मध्ये सात स्पोर्ट्स मोड्स दिले आहे. यात रनिंग, सायकलिंग आणि इनडोर स्विमिंग चा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. यात देण्यात आलेला हार्ट रेट सेन्सर २४ तासांत हार्ट रेट मॉनिटर करते. कंपनीच्या माहितीनुसार, हे ३० दिवसांचे पूर्ण हार्ट रेट मॉनिटरींगचा रिपोर्ट देते. Redmi Watch मध्ये स्लीम मॉनिटर दिला आहे. युजर्सला ब्रीदिंग एक्सरसाइजसाठी सजेशन देणार आहे. यात ऑक्सिजन लेवल मॉनिटर दिले नाही. यात ईसीजी सारखे फीचर्स सुद्धा देण्यात आले आहे. वाचाः Redmi Watch 7 दिवसांची बॅटरी बॅकअप देवू शकते. यात तुम्हाला १२ दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. याची बॅटरी 230mAh ची आहे. तसेच याला २ तास फुल चार्जिंग साठी लागतात. Redmi Watch ला सध्या चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. याची किंमती २९९ युआन ठेवली आहे. भारतात कधीपर्यंत ही लाँच करण्यात येणार यासंबंधी कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही. भारतात रेडमीच्या फोनला जबरदस्त मागणी आहे. त्यामुळे कंपनी भारतात ही स्मार्टवॉच लाँच करू शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fG6tMY