Full Width(True/False)

लॅपटॉपवर पाहत राहिला बिग बॉस, डॉक्टरांनी केली 'ब्रेन सर्जरी'

हैदराबाद- मनोरंजन क्षेत्रातील एक मजेशीर गोष्ट चाहत्यांना आज वाचायला मिळणार आहे. काही सिनेमे आणि टीव्ही मालिका अशा असतात की चाहत्यांना त्याचं वेड लागतं. तासन् तास तिच मालिका किंवा सिनेमा पाहावा असंच त्यांना वाटत असतं. याच्याशीच निगडीत एक आश्चर्यकारक बातमी आंध्रप्रदेशमध्ये घडली. एका रुग्णाला ओपन ब्रेन सर्जरी करायची होती. ऑपरेशनच्या वेळी रुग्णाला झोपायची परवानगी नव्हती अशा परिस्थितीत डॉक्टरांनी अनोखी शक्कल लढवली. रुग्णाला त्याचा आवडता टीव्ही शो '' आणि हॉलिवूड चित्रपट 'अवतार' दाखवला. जोपर्यंत त्याचे हे कार्यक्रम पाहून झाले तोपर्यंत रुग्णावरची शस्त्रक्रिया झाली होती. आंध्र प्रदेशातील गुंटूरची घटना ही घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे घडली आहे. 'इंडिया टुडे' च्या अहवालानुसार, वारा प्रसाद असं रुग्णाचं नाव आहे. न्यूरो सर्जन यांना शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला बेशुद्ध करायचे नव्हते. ओपन ब्रेन शस्त्रक्रियेद्वारे वाराच्या मेंदूत डाव्या बाजूला असलेल्या प्रीमोटर क्षेत्रातील ग्लिओमा काढून टाकायचा होता. यासाठी डॉक्टरांनी वाराला शस्त्रक्रिया संपेपर्यंत लॅपटॉपवर बिग बॉस आणि अवतार सिनेमा दाखवला. २०१६ मध्येही झालं होतं ऑपरेशन यापूर्वी २०१६ मध्ये वारावर शस्त्रक्रिया झाली होती. हैदराबादमध्ये झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर तो पूर्णपणे बरा झाला नव्हता. अशा परिस्थितीत डॉ. बी.एच. श्रीनिवास रेड्डी, डॉ. शेषाद्री शेखर आणि डॉ. त्रिनाध यांच्या टीमने पुन्हा गुंटूर येथे त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. चांगली गोष्ट अशी की वारा प्रसादची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्याला इस्पितळातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2IYysLE