Full Width(True/False)

४८ मेगापिक्सलसोबत Oppo K7x स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः मिडरेंज सेगमेंटमध्ये आपला आणला आहे. ५जी कनेक्टिविटीच्या या फोनमध्ये कंपनीने गेल्या महिन्यात टीच केला होता. आता याला अधिकृत लाँच केले आहे. या फोनमध्ये हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, क्वॉड रियर कॅमेरा आणि ऑक्टा कोर प्रोसेसर यासारखे फीचर्स दिले आहेत. कंपनी नवीन डिव्हाइस दोन कलरमध्ये तसेच एका रॅम व स्टोरेज व्हेरियंटमध्ये आणले आहे. तसेच कंपनीने नवीन डिवाइस कंपनी च्या Hyper Boost 3.0 गेमिंग टेक्नोलॉजीसोबत आणले आहे. वाचाः Oppo K7x ची किंमत ओप्पोने आपला नवीन डिव्हाइस चायनीज मार्केटमध्ये १४९९ युआन (१६ हजार ७०० रुपये किंमत) लाँच केला आहे. ही किंमत फोनच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजची आहे. हा फोन ब्लॅक मिरर आणि ब्लू शॅडो दोन रंगात खरेदी करता येवू शकतो. चीनमध्ये याचा सेल ११ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. तसेच या फोनला प्री ऑर्डर केले जात आहे. ग्लोबल मार्केटमध्ये तसेच भारतात याच्या लाँचिंग संबंधी अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. वाचाः वाचाः फोनचे खास वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल्स आहे. फोनला प्रोटेक्शन म्हणून ३ गोरिला ग्लास दिला आहे. मीडियाटेक Dimensity 720 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये रियर पॅनेलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर शिवाय ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी होल पंच कटआउट मध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यसााठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mLED48