Full Width(True/False)

अमली पदार्थ प्रकरणात भारती आणि हर्ष यांना दिलासा; जामीन मंजूर

मुंबई: अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेली कॉमेडियन आणि तिचा पती यांना रविवारी सुटीकालीन न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होता. त्यानंतर या दोघांतर्फे लगेचच जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज, सोमवारी सुनावणी झाली. भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांना न्यायदंधिकारी कोर्टाने दिला जामीन मंजूर केला आहे. दोघांनाही प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर करण्यातआला आहे. एनसीबीला तपासात सहकार्य करण्याचे आणि साक्षी पुराव्यांविषयी छेडछाड करू नये, असे निर्देशही कोर्टाने दिले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या निमित्तानं बॉलीवूड आणि ड्रग्जचे कनेक्शन पुन्हा एकदा समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्याचा कसून तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गत आजपर्यंत हिंदी सिने-टीव्हीसृष्टीतील अनेकांची चौकशी झाली आहे. ८६.५ ग्रॅम गांजा हस्तगत एका ड्रगविक्रेत्याच्या चौकशीतून माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी भारतीच्या अंधेरी, वर्सोवा येथील घरावर व कार्यालयावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी घरातून ८६.५ ग्रॅम गांजा हस्तगत केला. त्यानंतर भारतीला अटक करण्यात आली, तर हर्षला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. हर्षला १२ तासांच्या चौकशीनंतर रविवारी पहाटे अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही दुपारी सुटीकालीन न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 'न्यायालयाने एनसीबीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोघांनाही ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली',


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2V55rkp