मुंबई: गेल्या १२ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी '' ही मालिका यशाच्या शिखरावर आहे. मालिकेतल्या व्यक्तिरेखा, संवाद, सादरीकरण या सगळ्यामुळे मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. पण, मालिकेतला सगळ्यांचा आवडता म्हणजे अभिनेते यांनी थेट मालिकेच्या दर्जाबद्दलच भाष्य केलं आहे. दिलीप जोशी यांच्यासारख्या मुख्य अभिनेत्यानं मालिकेच्या लेखनाच्या दर्जावर परिणाम झाल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या बोलण्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 'मालिकेच्या लेखकावर रोज नवीन एपिसोडसाठी काम करण्याचा दबाव असतो, याचा परिणाम लेखनावर होतो. क्वांटिटीचा विचार केला की क्वालिटीवर परिणाम होणारच. सुरुवातीला आठवड्यातून एकदा मालिका दाखवली जायची. त्यामुळे लेखकांना पुरेसा वेळ मिळायचा. आता मात्र एखाद्या कारखान्याप्रमाणे झालं आहे. प्रत्येक दिवशी लेखकाला नवीन विषय शोधावा लागतो,' असं सांगत त्यांनी लेखकांची व्यथा मांडली आहे. मालिकेतले काही भाग हे विनोदाचा विचार करता दर्जात्मक नव्हते, अशीही कबुलीही त्यांनी दिली. दरम्यान, मालिकेत दया बेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी हिची एन्ट्री होणार की नाही? हे अद्यापही अस्पष्ट आहे. गोकुळधाममधला जेठालाल, गरबाक्वीन दयाबेन, कडक शिस्तीचे भिडे मास्तर, 'दुनिया हिला दूंगा' म्हणणारा पत्रकार पोपटलाल, खोडकर टप्पू, अय्यर, डॉ. हाथी, सोढी ही सगळी पात्रं आज प्रेक्षकांच्या कुटुंबाचा एक भाग बनली आहेत. पण मालिका कोणत्याही एका कलाकारामुळं यशस्वी होत नाही त्यामुळं संपूर्ण टीम मेहनत घेत असते, अशी प्रतिक्रिया असितकुमार मोदी यांनी दयाबेन म्हणजेच दिशा वकानीच्या कमबॅकवर दिली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32a50Ja