मुंबई टाइम्स टीम जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी भारताकडून '' या मल्याळी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ९३व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी हा सिनेमा भारतातर्फे ऑस्करला जाईल. 'जल्लीकट्टू'शिवाय आणखीही बरेच चित्रपट यासाठी शर्यतीत होते. 'शंकुतला देवी', 'शिकारा', 'गुंजन सक्सेना', 'भोंसले', 'गुलाबो सिताबो', 'सिरीयस मॅन', 'बुलबुल', 'कामयाब', 'द पिंक इज स्काय' या चित्रपटांचा यात समावेश होता. याशिवाय मराठी चित्रपट 'बिटरस्वीट' आणि 'डिसायपल'देखील यात होते. काय आहे चित्रपटाची कथा? 'जल्लीकट्टू' चित्रपटाची कथा वार्के आणि अँटनी नामक व्यक्तींवर आधारीत आहे, जे एक कत्तलखाना चालवत असतात. त्याच्या कत्तलखान्यामध्ये म्हशींना ठार मारून त्याचं मांस, कातडं आदी गोष्टींची विक्री होत असते. एक दिवस एक म्हैस कत्तलखान्यातून पळून जाते आणि बेफाम होऊन ती संपूर्ण गावात दहशत माजवते. या म्हशीला पकडण्यासाठी पोलिसांना बोलवले जाते. संपूर्ण गाव तिला पकडण्यासाठी एकत्र येतं. मात्र, ती म्हैस कुणालाही बधत नाही. त्या म्हशीला पकडण्यासाठी आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणारे विविध प्रयत्न या चित्रपटात बघायला मिळतात. ती म्हैस गर्दीतून स्वतःला कशी वाचवते तेही यात पाहायला मिळतं. पटकावले अनेक पुरस्कार'जल्लीकट्टू' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर २०१९ टोरंटो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात झाला होता. त्यानंतर हा चित्रपट २४व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आला होता. 'जल्लीकट्टू'चे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांना भारतातील ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (IFFI) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी दिला जाणारा पुरस्कार मिळाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला ५०व्या केरळ राज्य चित्रपट पुरस्कारात या सिनेमाला दोन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रणचा पुरस्कार मिळाला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3l8ptVH