Full Width(True/False)

संजयला भेटायला गेली कंगना रणौत, लोक म्हणाले चरसीसोबत बसलीस

मुंबई- सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमुळे घरापासून दूर आहे. सध्या ती एकाचवेळी 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. दरम्यान, चाहते सोशल मीडियावरही तिचे अ‍ॅक्टिव्हिटी अपडेट घेत असतात. नुकतंच तिने संजय दत्तसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलं. या फोटोवरून यूझर तिला ट्रोल करत आहेत. कंगनाने पोस्ट करत लिहिले की, जेव्हा मला कळलं की आम्ही दोघंही हैदराबादमध्ये एकाच ठिकाणी राहत आहोत, तेव्हा संजू सरांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी सकाळी पोहोचले. ते पूर्वीपेक्षा देखणे आणि निरोगी होते हे पाहून मी चकित झाले. आम्ही तुमच्या दीर्घायुष्य आणि चांगल्या आरोग्याची इच्छा करतो. या पोस्टवर यूझर्सने कंगनाला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेकांनी कंगनाला ट्रोल केलं तर काहींनी तिचं समर्थनही केलं. लोकांनी लिहिलं की, अमली पदार्थांचा विरोध करताना तू एका चरसीसोबतच जाऊन बसलीस? तर काहींनी लिहिले की, तो तर नेपोटिझमचं प्रोडक्ट आहे. तू तुझ्याच शब्दांविरूद्ध वागत आहे. संजू बाबाने तुझ्यापेक्षा जास्त सिनेमे त्याने दिले. पण तरीही तो तुझ्यासाठी नेपो किडच राहील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36byyc7