पुणे:'' ही मालिका सध्या चर्चेत आली आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री हिला डच्चू देण्यात आल्यानंतर निर्मात्या यांच्याकडून तिच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता गायकवाड विरुद्ध अलका कुबल असा वाद सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दोघींकडून देखील एकमेकींवर उघडपणे आरोप प्रत्यारोप केले जात आहे. प्राजक्तानं नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती. पत्रकार परिषदेत तिनं तिच्यावर करण्यात आलेले सर्वच आरोप फेटाळले आहेत. पत्रकार परिषदेत काय म्हणाली प्राजक्ता गायकवाड? निर्मात्या अलका कुबल यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना प्राजक्ता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. अलका ताईंना आई समान मानलं होतं. परंतु त्यांना ज्या गोष्टीची दखल घेऊन माझ्या पाठिमागं ठाम पणे उभं उभं राहायला पाहिजे होतं, त्यांनी त्या काही गोष्टी मालिका सुरू ठेवण्यासाठी दुर्लक्ष केल्या,म्हणून मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असं प्राजक्ता म्हणाली. मी मालिकेत काम करत असताना माझ्याबद्दल कोणत्याच तक्रारी नव्हत्या, पण मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. हे विचार करण्यासारखं आहे. तसंच यापूर्वी 'मी स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत दोन वर्षे काम केलं होतं. त्याआधी नांदा सौख्य भरे मालिकेच्या निर्मात्यांनी माझी कधीच तक्रार केली नाही.आता हे मला बदनाम करण्यासाठी केलं जात असल्याचं वाटतंय.अलका कुबल यांच्याबद्दल आजही आदर आहे. त्या माझ्यासाठी आई समान आहेत. आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या सहकलाकारवर कारवाई करण्यात यावी, अशी असं मला वाटतं होतं. आज त्यानं शिवीगाळ केली, उद्या आणखी काही होण्याच्या आधीच या सर्वावर एक निर्माती म्हणून अलका ताईंनी दखल घेणं गरजेचं होतं. पण त्यांनी बघू, करू अशी भूमिका घेतल्यानं, मी आणखी शूटिंग करू शकत नाही, असं त्यांना सांगितलं आणि मालिका सोडली. शूटिंग सुरू असताना इतर कोणाचं तरी रक्त लागेली साडी मला देण्यात आली होती. यावर माझ्या आईनं आक्षेप घेतला होता. यामुळं तिलाही सेटवर शिवीगाळ करण्यात आली. आईचा हस्तक्षेप म्हटलं गेलं. तसंच गेले चार महिने मी या मालिकेसाठी शूटिंग केलं. पण एक रुपयांचं पेमेंट देखील मला देण्यात आलं नाही. इतकं समजून घेतल्यानंतरही माझ्यावर आरोप होत असल्यानं वाईट वाटतं, अशा शब्दांत प्राजक्तानं तिची बाजू मांडली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mLlbo8