Full Width(True/False)

सुशांतसोबतच्या ब्रेकअपनंतर अंकिता लोखंडेने ठेवलेलं करवाचौथ

मुंबई- विकी जैनसोबतच्या नात्यात फार समाधानी आहे. दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे यावर्षी अंकिताने विक्कीसाठी करवाचौथचा उपवास ठेवला तर तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटणार नाही. अंकिता सारेच सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करत असते. या करवाचौथ निमित्त अंकिताचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. यात सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने ज्या पद्धतीने करवाचौथचं सेलिब्रेशन केलं होतं ते आता पुन्हा चर्चेत आलं आहे. सहा वर्ष सुशांत- अंकिता होते रिलेशनशिपमध्ये सुशांत आणि अंकिता जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप झाल्यानंतर काही महिन्यांनी तिने करवाचौथ साजरा केला होता. यावेळी तिने लाल साडी नेसली होती तर केसांत गजरा माळला होता. याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. 'सुशांत आता तुझ्यासोबत नाही तर कोणासाठी उपवास केला आहेस?' अशा पद्धतीचे प्रश्न तिला या पोस्टवर विचारण्यात आले होते. विक्की जैनसाठी लिहिलेली पोस्टही आली चर्चेत अंकिताने चाहत्यांनी दिलेल्या कोणत्याच प्रतिक्रियेला उत्तर दिलं नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे यांनी विकी जैनसाठी एक सुंदर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एक पार्टनर म्हणून विक्की कसा आहे हे तिने या पोस्टमध्ये सांगितलं. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने त्याच्या कुटुंबाचं उघडपणे समर्थन केलं. तो अजूनही सुशांतच्या कुटूंबाशी संपर्कात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HZrRQL