मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ईशानं ही दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ईशानं तिच्या वडिलांचा एक फोटो शेअर केलाय. त्या फोटोवर त्यांची जन्मतारीख आणि निधनाची तारीख लिहिण्यात आली आहे. २४ नोव्हेंबर रोजी ईशाचे वडिल चैतन्य केसकर यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनानं ईशा खचली असून कोणासोबतही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीए, असं तिच्या जवळील व्यक्तिनं सांगितलं आहे. ईशासाठी तिचे वडिल हे सर्वांत जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. सोशल मीडियावक अनेकदा या गोष्टीचा तिनं तिच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. तिच्या प्रत्येत निर्णयात तिला तिच्या वडिलांनी साथ दिली होती. 'जय मल्हार' ही ईशाची पहिली मालिका होती. मालिकेच्या ऑडिशनला जाताना तिच्या बाबांनी एक प्रयत्न कर. आपणास हवे ते क्षेत्र आपली वाट पहात असतंच, असं म्हणतं तिला या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mpjDQU