मुंबई: '' मालिका गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मालिकेसंदर्भात सुरू असलेला वाद संपला असून मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील पात्रं, असो किंवा मालिकेचा सेट, सर्वच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिकेतील ग्राफिक्स आणि व्हिएफक्स देखील चर्चेचा विषय ठरत आहेत. मालिकेचे निर्माते यांनी एक व्हिडिओ शेअर करत व्हिएफएक्स (VFX)ची जादू प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. कोठारे यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत तंत्रज्ञानाचा मालिकेत कसा वापर होतो, हे दाखवण्यात आलं आहे. मालिकेविषयी महेश कोठारे सांगतात की, 'दख्खनचा राजा ज्योतिबा ही मालिका म्हणजे ज्योतिबाची कथा आहे. ज्योतिबा हे पश्चिम महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहे. अंबाबाईच्या हाकेला धावून आलेला हा देव ज्याने रत्नासूर, कोल्हासुर आणि औंधासुराचा वध केला. कोल्हासुराचा वध झाल्यानं त्या परिसराला कोल्हापूर असं नाव पडलं. या कथा आपण पुराणात वाचल्या असल्या, तरी पहिल्यांदाच मालिकेच्या रुपात त्या पाहायला मिळत आहेत. पौराणिक मालिका साकारणं हे फार आव्हानात्मक असतं. मराठीमध्ये बजेटची मर्यादा एक तर हिंदीच्या तुलनेत मराठीमध्ये बजेटची मर्यादा असते. तरीही मालिकेची भव्यता कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. व्हीएफएक्स उत्तम प्रकारे दिसणं महत्त्वाचं असतं. या मालिकेसाठी कोल्हापुरात भव्यदिव्य सेट उभा करण्यात आलाय. जवळपास दीड महिन्यापासून सेटचं काम सुरू होत. कोल्हापुरात असा भव्य सेट उभारणं हेदेखील आव्हान होतं. कलादिग्दर्शक संतोष फुटाणे आणि संपूर्ण टीम सेट उभारण्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. यामध्ये ज्योतिबाचा महाल, महालक्ष्मीचा महाल, गाव, आश्रम, क्रोमा फ्लोअर यांचा समावेश आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33hSrMH