Full Width(True/False)

अखेरचा श्वास घेण्यापूर्वी हे होते अभिनेत्यांचे शेवटचे शब्द

मुंबई- हे वर्ष बॉलिवूडकरांसाठी फारसं चांगलं वर्ष नव्हतं. या वर्षाने अनेक कलाकारांना चाहत्यांपासून कायमचं दूर केलं. , यांच्या निधनातून सावरत असतानाच अभिनेता याच्या निधनाची बातमी समोर आली. त्याच्या मृत्यूचा तिढा अजूनही सुटलेला नाही. असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी यावर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला. आज आम्ही तुम्हाला निधनापूर्वी अभिनेत्यांनी सोशल मीडियावर काय शेअर केलं होतं ते सांगणार आहोत. ऋषी कपूर यावर्षी ३० एप्रिलला बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. गेली दोन वर्ष ते कर्करोगावर उपचार घेत होते. पण कर्करोगासोबतच्या लढाईत त्यांची हार झाली. आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये त्यांनी सर्वांना मिळून मिसळून राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मी माझ्या सर्व भाऊ-बहिणींना हिंसा, दगडफेक किंवा हत्येसारखं कोणतंही कृत्य करू नका अशी विनंती करतो. डॉक्टर, परिचारिका, मीडिया कर्मचारी आणि पोलीस सर्वजण आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. आपण एकत्र येऊन करोना विषाणूला हरवू शकतो. जय हिंद..' इरफान खान बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांनीही २९ एप्रिलला जगाला निरोप दिला होता. इरफान खानदेखील कर्करोगाशी झुंजत होते. आईच्या मृत्यूच्या काही दिवसांनंतर इरफान यांचं निधन झालं. आईच्या निधनामुळे ते फार दुःखी झाले होते. आपल्या अखेरच्या क्षणांमध्ये त्यांनी पत्नीला सांगितलं, 'अम्मा इथे आहे, ती मला घ्यायला आली आहे. ती माझ्या खोलीत आहे.. ती मला पाहतेय.. ती माझी या वेदनेतून मुक्तता करायला आहे... ती माझ्या बाजूला बसली आहे.' सुशांतसिंह राजपूत वयाच्या ३४ व्या वर्षी अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. सुशांतचं आईवर अतोनात प्रेम होतं. त्याने आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं की, 'डोळ्यांमधल्या अश्रूंनी धुक्यातल्या भूतकाळ अजून पुसट होतोय. कधीही न संपणारी स्वप्न आणि लवकरच संपणारं जीवन या दोघांमध्ये संभाषण सुरू आहे.' बॉलिवूडमध्ये काका या नावाने परिचित सुपरस्टार राजेश खन्ना यांनी १८ जुलै २०१२ रोजी जगाला निरोप दिला. वाढत्या वयोमानामुळे होणाऱ्या आजारांमुळे राजेश खन्ना यांचं निधन झालं. 'वेळ संपली! सामान बांधा.' हे त्यांचे अखेरचे शब्द होते. अभिनेते, संगीत दिग्दर्शक, गायक, गीतकार, दिग्दर्शक किशोर कुमार यांचं १३ ऑक्टोबर १९८७ रोजी निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. 'मी ठीक आहे, पण जर तुम्ही डॉक्टरांना बोलावले तर मला हृदयविकाराचा झटका येईल.' हे त्यांचे अखेरचे शब्द होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36D0Zys