मुंबई- शाहरुख खानचा '' सिनेमा २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या वर्षाचा तो सर्वात गाजलेला सिनेमा होता. या सिनेमाने त्या वर्षी अनेक पुरस्कारही जिंकले होते. या सिनेमात अभिनेत्री दिसली होती. विद्याने सिनेमात विद्या शर्मा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. विद्याने नुकतंच मिसमॅच या सीरिजमध्ये काम केलं. यात तिने झीनत करीम नावाच्या मुलीची भूमिका साकारली. या सीरिजमध्ये ती ४१ वर्षांची महिला दाखवली आहे जिच्या नवऱ्याचं निधन झालेलं असतं. फार कमी लोकांना माहीत आहे की, ४७ वर्षीय विद्याच्या वास्तविक आयुष्यातही अशीच काहीशी घटना होऊन गेली आहे. तिच्या खासगी आयुष्यात अनेक चढ- उतार आले आहेत. लग्नाच्या तीन वर्षानंतर नवऱ्याचं झालं निधन विद्या सुरुवातीला एअर हॉस्टेस होती. १९९७ मध्ये तिने पायलट कॅप्टन अरविंदसिंग बग्गाशी लग्न केलं. पण लग्नाच्या तीन वर्षांनंतर तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. २००० मध्ये, तिच्या पतीचं एका विमान अपघातात निधन झालं. पाटण्यात ही घटना घडली. नवऱ्याच्या निधनानंतर आली बी-टाउनमध्ये विद्याने तिच्या पतीच्या निधनानंतर तीन वर्षांनंतर २००३ मध्ये अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली. २००३ मध्ये तिने ‘इंतेहा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चक दे इंडिया' या सिनेमातून तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने 'बेनाम', 'किडनैप', 'तुम मिलो तो सही', 'आप के लिए हम', 'नो प्रॉब्लम', 'दस तोला', 'स्ट्राइकर', '१९२०: एविल रिटर्न्स', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' आणि 'यारा सिल्ली सिल्ली' अशा सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. २००९ मध्ये केलं दुसरं लग्न २००९ मध्ये विद्याने संजय दयमा यांच्याशी लग्न केलं. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘लगान’ सिनेमात संजयने पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35TIh6E