Full Width(True/False)

'बाहुबली' प्रभास आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा चाहता

मुंबई :'बाहुबली'नंतर ज्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे असा अभिनेता चर्चेत आहे. अभिनेता प्रभासचे लाखो चाहते असले, तरी खुद्द तो मात्र नव्वदीच्या दशकातील एका अभिनेत्रीचा मोठा चाहता आहे. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर तो आगामी '' या चित्रपटात काम करणार आहे. ही अभिनेत्री आहे . 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून सलमानबरोबर सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या भाग्यश्रीचे तेव्हा खूप फॅन्स होते. त्यात स्वत: प्रभासही होता. या अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. परंतु मधल्या काळात ती सिनेसृष्टीपासून दूर गेली होती. ''मैंने प्यार किया' हा चित्रपट बघूनच मी भाग्यश्री यांच्यावर फिदा झालो होतो. 'राधे श्याम' या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करायला मिळतंय याचा मला आनंद वाटतोय', असं प्रभासनं सांगितलं आहे. या चित्रपटात भाग्यश्री प्रभासच्या आईची भूमिका साकारत असल्याचं समजतं. प्रभास पक्का खवय्या आहे. तो सेटवर विविध प्रकारचे चमचमीत खाद्यपदार्थ आणतो आणि भाग्यश्रीलासुद्धा ते आग्रहानं खाऊ घालत असतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mZAJVs