मुंबई- गायक यांनी ९० च्या दशकात आपल्या मधुर आवाजाने सर्वांना अक्षरशः वेड लावलं होतं. त्यांच्या नावावर एकाहून एक सरस सुपरहिट गाण्यांची नोंदही आहे. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी आणि बंगाली भाषांमध्येही गाणी गायली आहेत. चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. फार कमी लोकांना माहीत आहे की उदित नारायण यांनी दोन लग्न केली. त्यांनी दुसऱ्या लग्नाबद्दल अनेक वर्ष कोणालाही सांगितलं नव्हतं. उदित नारायण यांचं पूर्ण नाव उदित नारायण झा आहे. त्यांचा जन्म बिहारच्या सुपौल जिल्ह्यात झाला. त्याचा नेपाळशी जवळचा संबंध आहे. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीतून नाही तर नेपाळी सिनेमातून केली होती. 'सिंदूर' असं त्या नेपाळी सिनेमाचं नाव होतं. सुमारे दहा वर्षांच्या संघर्षानंतर उदित नारायण यांनी पहिलं सुपरहिट गाणं गायलं. या गाण्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. हे गाणं म्हणजे 'कयामत से कयामत तक' सिनेमातील 'पापा कहता बड़ा नाम करेगा'. हे गाणं आमिर खानवर चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्यानंतर उदित नारायण यांना बर्याच ऑफर मिळाल्या. २००६ मध्ये रंजना नारायण यांनी उदित नारायण त्यांचा नवरा असल्याचा दावा केला. हा दावा उदित यांनी नाकारला. त्यानंतर रंजनाने न्यायालयाकडे धाव घेतली आणि लग्नाचे कागदपत्र दाखवले. यानंतर उदित यांनी लग्नाचा स्वीकार केला. कागदपत्रांच्या आधारावर न्यायालयानेही रंजना यांना उदित यांच्या पत्नीचा अधिकार दिला. विवाहित असूनही, उदित नारायण यांनी १९८५ मध्ये दिपा नारायणसोबत लग्न केलं होतं. दिपा आणि उदित यांना हा एक मुलगाही आहे. आदित्य देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच पार्श्वगायक आहे. वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशीच तो प्रेयसी श्वेता अग्रवालशी लग्न करणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Jkt1Hs