Full Width(True/False)

छळ काही थांबेना! इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी वाजिदच्या पत्नीवर सासरच्यांकडून दबाव

मुंबई: बॉलिवूडचे दिवंगत संगीतकार यांच्या पत्नीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. वाजिदच्या कुटुंबियांकडून सतत धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणला जातोय, असं त्याची पत्नी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. वाजिद यांची पत्नी कमलरुख खान यांची ही सोशल मीडियावरची पोस्ट सध्या चर्चेत असून अनेकांनी याच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमलरुख यांनी वाजिद यांच्या कुटुंबियांवर इस्लाम धर्म स्विकारावा म्हणून खान कुटुंबियांनी आपला छळ केल्याचा गंभीर असा आरोप केला आहे. कमलरुख यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय तरी काय?वाजिद यांच्या पत्नी कमलरुख खान या मूळच्या पारसी आहेत. त्यांच्या कुटुंबात नेहमीच स्त्रियांना मान सन्मान मिळाला. त्यांच्या मतांना तितकाच आदर देखील दिला जातो. सुसंस्कृत, सुशिक्षित कुटुंबात वाढलेल्या कमलरुख यांचा वाजिद खान यांच्यासोबत निकाह झाला. पण वाजिद यांच्या घरात याऊलट वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्त्रियांना स्वत:चं मत असू शकतं हे खान कुटुंबात नाकारण्यात आलं. माझ्यावर सतत इस्लाम धर्म स्विकारावा यासाठी दबाव आणला गेला. मी नेहमीत त्यांच्या धर्माचा ,संस्कृतीचा आदर करत आले. पण त्यांच्याकडून मी ईस्लाम धर्म स्विकारावासाठी छळ देखील करण्यात आला. इतकंच नाही तर, ईस्लाम स्विकारला नाही म्हणून मला आणि वाजिदला दूर करण्यासाठीही प्रयत्न केले गेले होते. आमच्यामध्ये घटस्फोट घडवून आणण्याचाही प्रयत्न खान कुटुंबियांकडून केला गेला. मी ईस्लाम धर्म स्विकारायला तयार नव्हते, यासाठीमी शेवटपर्यतं नकार दिला. वाजिदच्या निधनानंतरही हे सुरूचं असल्याचं कमलरुख म्हणतात. माझे पती वाजि खान हे चांगले संगीतकार होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अधिक वेळ संगीतासाठी दिला होता. त्यांनी मला आणि मुलांसोबत आणखी वेळ घायवायला हवा होता, धर्मांतरावरून सुरू असलेल्या वादामुळं आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकलो नाही, असं कमलरुख यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o89zwb