Full Width(True/False)

८ वर्ष प्रयत्न केल्यानंतर बोरिवलीमध्ये लागली म्हाडाची लॉटरी; हेमांगी कवीचा नवीन घरात गृहप्रवेश

मुंबई: मुंबईसारख्या मोठ्या शहरात आपलं एक घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अभिनेत्री हिनं पाहिलं आणि ते पूर्णही झालं. तिला यासाठी संघर्ष करावा लागलाच, पण त्याचबरोबर संयमही दाखवावा लागला. गेली ८ वर्ष प्रयत्न केल्यानंतर बोरिवलीमध्ये तिचं स्वत:चं घर झालं आहे. यंदाच्या दिवाळीचं निमित्त साधून तिनं आपल्या घराचे फोटो आणि त्याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. इंडस्ट्रीतल्या तिच्या मित्रपरिवाराकडून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. हेमांगीनं एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नव्या नवलाईने गृहप्रवेश... मुंबई सारख्या ठिकाणी घर घेणं आमच्या सारख्यांना अशक्य आहे हे खूप आधीच आमच्या लक्षात आलं होतं. म्हणून मग '' मध्ये सलग 8 वर्ष प्रयत्न केल्यावर एकदाची २०१६ मध्ये मला लॉटरी लागली आणि बोरीवलीत आम्हांला घर लाभलं. तोपर्यंत आम्ही भाडेतत्त्वावर कधी दादर तर कधी दहिसर मध्ये रहायलो. पण प्रत्यक्षात घर हातात यायला नोव्हेंबर २०१९ उजाडलं. पजेशनचे सर्व तांत्रिक सोपस्कार आटपून आणि आम्हांला हवी तशी सजावट करून घेऊन फेब्रुवारी मध्ये आम्ही आमच्या हक्काच्या घरात 'गृहप्रवेश' केला! त्यावेळी आम्ही दोघे ही मालिकांमध्ये प्रचंड व्यस्त होतो आणि नंतर मार्च मध्ये करोनामुळे आम्ही गावी निघून गेलो. चार महिने साताऱ्याला राहून आम्ही जून मध्ये आमच्या या नवीन घरात परतलो. पण मग जून पासूनच पुन्हा कामं सुरू झाली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात शूटिंगसाठी निघून गेलो. त्यामुळे खूप काळ आम्हांला आमच्या या नवीन घरात राहायलाच मिळालं नाही किंवा कुठलेच सण नीटसे साजरे करता आलेच नाहीत. पण मग यावेळी मात्र काहीही झालं, कितीही बिझी असलो तरी 'दिवाळी' सुट्टी घेऊन आपल्या या पहिल्यावहिल्या, नवीन, हक्काच्या घरात साजरी करायचीच असं ठरवून टाकलं. यंदाची आमची दिवाळी, आमचा पाडवा या नवीन, हक्काच्या घरात साजरा करतोय! तुमचे आशीर्वाद असू द्यात!


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kPGOCJ