Full Width(True/False)

स्वतःच्याच लग्नात बेभान होऊन नाचले आदित्य नारायण- श्वेता अग्रवाल

मुंबई- आदित्य नारायणच्या लग्नाबद्दल त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. आदित्यने १ डिसेंबरला गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न केलं. बऱ्याच दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू होती. स्वतः आदित्यनेही लग्नाशी संबंधीत कार्यक्रमांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, आदित्य नारायणच्या लग्नाच्या मिरवणुकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात तो श्वेतासोबत भांगडा करताना दिसत आहे. दोघंही या खास प्रसंगी आनंदी तर आहेतच शिवाय प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगताना दिसत आहेत. एका मुलाखतीत आदित्य नारायणने सांगितलं होतं की त्यांच्या लग्नात फक्त ५० पाहुणे उपस्थित राहतील. २ डिसेंबर रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एक रिसेप्शन ठेवलं जाणार आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी सांगितलं की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमिताभ बच्चन आणि सिनेउद्योगातील अनेक लोकांना निमंत्रण पाठवलं आहे. आदित्य-श्वेता १० वर्षांपासून करत आहेत एकमेकांना डेट आदित्य नारायणने आपल्या लव लाइफबद्दल सांगताना म्हचलं की ते जवळपास १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. दोघं पहिल्यांदा सिनेमाच्या सेटवर भेटली होती. सुरुवातीला झालेल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर कधी झालं ते त्यांचं त्यांनाही कळलं नाही. आदित्यला तो प्रेमात असल्याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा तो श्वेताच्या अक्षरशः मागे लागला. सुरुवातीला तिला फक्त मैत्रीण म्हणून राहायचे होते. कारण आम्ही दोघंही खूप तरुण होतो आणि आम्हाला आपल्या करिअरवर लक्ष देण्याची गरज होती. प्रत्येक नात्याप्रमाणेच आम्हीही गेल्या १० वर्षात नात्यात चढ- उतार पाहिले आहेत. लग्न ही आता फक्त आमच्यासाठी औपचारिकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lkengk