Full Width(True/False)

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला पुन्हा दिलासा

मुंबई: शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काळवीट शिकार आणि अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी सलमानला न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सलमानला या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यासाठी आज म्हणजे १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी १६ जानेवारी २०२१मध्ये होणार आहे. या सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टानं सलमानला दिले आहेत. जिल्हा व सत्र जिल्हा न्यायाधीश राघवेंद्र कछवाल यांच्या न्यायालयात आज सलमानला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु त्याचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी न्यायालयात सलमानची बाजू मांडली .‘ मुंबईत राहत असल्यानं सध्याच्या परिस्थीतीत त्यांनी जोधपुरला येणं धोकादायक होतं. करोनाचा संसर्ग दोन्ही शहरात वाढला आहे. त्यामुळं ते या सुनावणीस हजर राहु शकले नाहीत. यावेळस त्याला माफ करावं',असा युक्तिवाद हस्तीमल सारस्वत यांनी कोर्टात केला. त्यामुळं सलमानला जानेवारी महिन्यात सुनावीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काय आहे प्रकरण? '' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान १९९८ साली सलमाननं राजस्थानमध्ये काळवीटाची शिकार केली होती. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यानं त्याला सहा दिवस जोधपूर तुरुंगात घालवावे लागलं होतं. मात्र, त्यानंतर हायकोर्टानं त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. राजस्थानात १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है‘ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरविण्यात आलं होतं. या प्रकरणी त्याला दोनवेळा १९९८ आणि २००७ मध्ये जोधपूर कारागृहात जावं लागलं आहे. या प्रकरणात सलमानसह चित्रपटातील अन्य कलाकार सैफअली खान, तब्बू,सोनाली बेंद्रे व नीलम यांच्यावर आरोप करण्यात आले होते. पण, सलमानकडं शस्त्र सापडल्यानं त्याला दोषी ठरविण्यात आलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qcGbqJ