Full Width(True/False)

वोडाफोन-आयडिया ग्राहकांना झटका, कंपनीने महाग केले दोन प्रसिद्ध प्लान

नवी दिल्लीः वोडाफोन आयडियाने आपले दोन प्रसिद्ध पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. हे प्लान ५९८ रुपये आणि ७४९ रुपयांचे प्लान आहेत. आता ५९८ रुपयांच्या प्लानच्या सर्विससाठी युजर्संना ६४९ रुपये द्यावे लागतील. तर ७४९ रुपयांच्या प्लानसाठी ७९९ रुपये मोजावे लागतील. वाचाः ६४९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार बेनिफिट वोडाफोन-आयडियाच्या या प्लानमध्ये युजर्संना एकूण ८० जीबी डेटा ऑफर केला जातो. हा एक फॅमिली प्लान आहे. यात मिळणाऱ्या डेटा प्रायमरी आणि सेकंडरी कनेक्शन दरम्यान स्प्लीट असतो. प्रायमरी कनेक्शनला या प्लानमध्ये ५० जीबी आणि सेकंडरी कनेक्शनला या प्लानमध्ये ३० जीबी डेटा मिळतो. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात एका महिन्यासाठी फ्री १०० एसएसएस सोबत देशात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. वाचाः ७९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट कंपनी आपल्या पोस्टपेड प्लानमध्ये १२० जीबी डेटा देत आहे. या फॅमिली प्लानमध्ये प्रायमरी युजरला ६० जीबी आणि बाकीच्या युजर्संना ३०-३० जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये कंपनी देशात कोणत्याही नेटवर्कवर साठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एका महिन्यासाठी १०० फ्री एसएमएस देत आहे. वाचाः दोन्ही प्लानमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट दोन्ही प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिटमध्ये प्रायमरी कनेक्शन ला अॅमेझॉन प्राईम आणि मूव्हीज अँड टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्सन मिळते. दोन्ही प्लानच्या नॉन प्रायमरी कनेक्शन्सला कंपनी केवळ वोडाफोन-आयडिया आणि टीव्हीचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर करते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36nzqdw