Full Width(True/False)

२५ हजारांपेक्षा कमी किंमतीत ५ बेस्ट स्मार्टफोन, फीचर्स आहेत जबरदस्त

नवी दिल्लीः यावर्षी स्मार्टफोन कंपन्यांनी हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, मोठी बॅटरी, पंचहोल स्क्रीन आणि दमदार हार्डवेयरचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. क्वॉड कॅमेरा सेटअप सुद्धा यावर्षी ट्रेंडमध्ये होते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी खास स्मार्टफोन संबंधी माहिती देत आहोत. जे मिड प्रीमियम कॅटेगरीत येतात. ज्याची किंमत २५ हजारांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः वनप्लस नॉर्ड २०२० मध्ये लाँच झालेला बेस्ट स्मार्टफोनपैकी एक आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये आलेला हा पहिला ५जी स्मार्टफोन आहे. डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 765G 5G प्रोसेसर दिला आहे. फोन वनप्लसच्या ऑक्सीजनओएस वर काम करतो. सर्वात बेस्ट एक्सपीरियन्स ऑफर करणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टमपैकी एक आहे. फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड पॅनेल, ३० वॉट फास्ट चार्जर आणि 4115mAh बॅटरी दिली आहे. वाचाः रेडमी नोट ९ प्रो मॅक्स एक ऑल राउंडर स्मार्टफोन आहे. रेडमी नोट सीरीजचा हँडसेट या सेगमेंटमध्ये सर्वात जबरदस्त कॅमेरा आणि डे टू डे परफॉर्मन्स देतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये ६.६७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. वाचाः रियलमी नार्जो २० प्रो २०२० मध्ये लाँच झालेला सर्वात चांगल्या स्मार्टफोन पैकी एक आहे. हा एक जबरदस्त बजेट फोन आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स मिळतात. या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट, फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी, ४८ मेगापिक्सलाचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि मीडियाटेक हीलियो जी ९५ प्रोसेसर दिला आहे. वाचाः पोको एक्स ३ सुद्धा २०२० मध्ये लाँच करण्यात आलेला दमदार स्मार्टफोन आहे.यात 6000mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या सेगमेंटमध्ये हा एकमेव फोन आहे जो स्टीरियो स्पीकर्स आणि १२० हर्ट्ज डिस्प्ले ऑफर करतो. पोको एक्स ३ मध्ये जबरदस्त डिस्प्ले आणि पॉवरफुल हार्डवेयर आहे. वाचाः विवो व्ही २० स्मार्टफोन २०२० मध्ये आलेल्या जबरदस्त स्मार्टफोनपैकी एक आहे. हा फोन २५ हजारांपेक्षा कमी किंमतीत येणारा बेस्ट सेल्फीचा स्मार्टफोन आहे. सेल्फी प्रेमींसाठी हा फोन जबरदस्त आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WSnaw1