Full Width(True/False)

दक्षिणेतल्या 'या' सुपरस्टारला करोनाची लागण;चाहते चिंतेत

मुंबई: दक्षिणेतील सुपरस्टार याला झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं याबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर राम चरण यानं स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. राम चरणचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असला तरी, त्याला करोनाची कोणतीही लक्षणं जाणवत नसल्याचं त्यानं सांगितलं आहे. 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्यातरी मला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीएत. मी घरातच क्वारंटाइन झालो आहे. आशा आहे की, मी लवकरच ठिक होईन. तसंच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी. माझ्या तब्येतीची माहिती लवकरच कळवेन', असं राम चरण यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. नोव्हेंबर महिन्यात राम चरण याचे वडील चिरंजीवी यांना देखील करोनाची लागण झाली होती. तिसऱ्यांदा करोनाची चाचणी केल्यानंतर त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. राम चरण याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, की तो लवकरच एसएस राजामौली यांचा चित्रपट 'आरआरआर' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो ज्युनिअर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील त्याचा लुक शेअर करण्यात आला होता. या चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या २०१२१मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.


    from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aPbTop