मुंबई- बॉलिवूडमध्ये जेवढ्या लवकर लग्न होतात. तेवढ्याच लवकर लग्न तुटतातही. विशेष म्हणजे यात काही स्टार्सना लग्नाच्यावेळी जेवढा खर्च आला नसेल त्याहून दुप्पट ते तिप्पट खर्च घटस्फोटावेळी आला आहे. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार, दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांनी आतापर्यंत घटस्फोट घेतले आहेत. घरगुती मतभेद आणि एकमेकांना फसविल्यामुळे त्यांनी लग्न संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. पण एकमेकांपासून विभक्त होताना त्यांना बरेच पैसे मोजावे लागले. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्टार्स कपल्सबद्दल सांगणार आहोत. - अधुना फरहान अख्तरने २०१६ मध्ये पत्नी अधुनाशी घटस्फोट घेतला होता. या घटस्फोटासाठी फरहानने अधुनाला भरमसाठ मोबदला दिला होता. मात्र, अधुनाला नेमकी किती रक्कम दिली गेली हे सांगण्यात आलं नाही. असं म्हटलं जातं की, फरहानने अधुनाला पोटगी म्हणून १० हजार चौरस फूटचा बंगला दिला होता. - रिया पिल्लई अभिनेता संजय दत्तने १९९८ मध्ये आपली दुसरी पत्नी रिया पिल्लईशी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर संजयने रियाला एकमुखी रक्कम दिली नाही. त्याऐवजी संजय अजूनही रियाचा संपूर्ण खर्च करत असल्याचं म्हटलं जात आहे. याशिवाय त्याने रियाला पोटगी म्हणून सी- फेसिंग फ्लॅट आणि लक्झरी कार दिली होती. करिश्मा कपूर- संजय कपूर लग्नाच्या काही वर्षानंतर करिश्मा कपूरने तिचा नवरा संजय कपूरशी घटस्फोट घेतला. या दोघांमध्ये बरीच वर्ष वाद सुरू होते. २०१६ मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. घटस्फोटानंतर संजयने करिश्मा कपूरला ७ कोटी रुपये दिले. याशिवाय संजयने दोन्ही मुलांच्या नावावर १४ कोटींचे बाँड विकत घेतले. करिश्माला घरही देण्यात आलं होतं. सैफ अली खान- अमृता सिंग आणि अमृता सिंग यांनी लग्नाला १० वर्ष झाल्यानंतर २००४ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. घटस्फोटानंतर सैफने अमृताला पोटगी म्हणून ५ कोटी रुपये दिले होते. हृतिक रोशन- सुझान खान बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट म्हणजे सुझान खान आणि यांचा. लग्नाच्या १४ वर्षांनंतर सुझान आणि हृतिकने २०१४ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार, हृतिकने सुझानला पोटगी म्हणून जवळपास ४०० कोटी रुपये दिले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qzzK0X