Full Width(True/False)

'मी जन्मापासूनच मूर्ख..'; शेहला रशीद वादात कंगनानं घेतली उडी

मुंबई: विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या यांच्यावर त्यांचेच वडिल अब्दुल रशीद शौरा यांनी देशद्रोहाचा आरोप केलाय. यावर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेहमी प्रमाणेच अभिनेत्री कंगना रनौत हिनं या सर्व वादात एक ट्विट केलं आहे. शेहला रशीद यांच्यावर देशद्रोहाचा आपोर करण्यात आल्यानंतर कंगनानं केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. ' केल्यानंतर तुम्हाला संपत्ती, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मित्र, साथी सगळं काही मिळतं. पण तुम्ही देशप्रेमी असाल तर तुमचे शत्रू निर्माण होतील. तुमच्या वाट्याला संघर्ष वासराहक्कानं मिळेल. आता हा तुमचा निर्णय आहे. तुम्हाला काय निवडायचं आहे. मी तर जन्मापासूनच मूर्ख आहे',असं खोचक ट्विट कंगनानं केलं आहे. काय आहे हा वाद? आपल्या पत्नी, मुलीवर गंभीर आरोप करणाऱ्या अब्दुल रशीद यांनी जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांना पत्र लिहलंय. या पत्रात त्यांनी शेहला हिने एका काश्मीर व्यावसायिक असलेल्या जाहूर अहमद शाह वताली याच्याकडून तीन कोटी रुपये घेतल्याचा आरोप केलाय. उल्लेखनीय म्हणजे, वताली आणि माजी आमदार इंजिनियर रशीद यांना एनआयएनं दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करत २०१७ आणि २०१९ साली अटक केली होती. काश्मीरमध्ये हुर्रियत सारखी नवी संघटना उभारण्याचा शेहला हिचा प्रयत्न होता असाही आरोप तिच्या वडिलांनी केलाय. कोण आहेत शेहला रशीद?शेहला रशीद यांनी एनआयटी श्रीनगर मधून इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी इंजिनिअर म्हणून काही दिवस नोकरीही केली. त्यानंतर मात्र त्या सामाजिक आंदोलनांशी जोडल्या गेल्या. फेब्रुवारी २०१६ मध्ये जेएनयूचे तत्कालीन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपांत अटकेनंतर शेहला यांनी आंदोलनही केल्यानं त्या चर्चेत आल्या होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qk5QgS