Full Width(True/False)

सलमानने तुटलेल्या नात्यावर केलं भाष्य, 'सुरुवातीला चांगलं वाटतं'

मुंबई- सलमान खानला बॉलिवूडच्या कट्टर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं आहे. फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. सलमान त्याच्या सिनेमांसाठी जेवढा ओळखला जातो त्याहून जास्त तो त्याच्या मैत्रीसाठी ओळखला जातो. अलीकडेच त्याने स्पष्ट केलं की त्याला मैत्री करायला वेळ लागतो आणि त्याचे जे मित्र आहेत त्यांची आणि सलमानची मैत्री २०- ३० वर्ष जुनी आहे. सलमान म्हणाला, २०- ३० वर्ष जुने मित्र आहेत मीडिया रिपोर्टनुसार, एका वृत्तवाहिनीशी बोलताना सलमान म्हणाला की त्याला मित्र बनवण्यात खूप वेळ लागतो. त्यामुळेच त्याचे सर्व मित्र हे २०-३० वर्ष जुने आहेत. जे काही नवीन लोक त्याच्या आयुष्यात येतात ते देखील उत्तम मित्र आहेत. पण त्याचे चार ते पाच मित्र आहेत त्यांची बरोबरी कोणासोबतही नाही. कमी जास्त रिलेशनशिपची गरजच वाटत नाही सलमान म्हणाला, सुरुवातीला सगळेच लोक चांगले वाटत असतात. वेळ जातो तसा एकमेकांच्या उणीवा दिसू लागतात. जर तुम्हाला त्यांच्या उणींवाचा त्रास होत नाही तर सर्व काही चांगलं आहे. कारण त्यांचे गुण हे त्यांच्या उणीवांपेक्षा हजारपटीने मोठे असतात. म्हणूनच जर आपण त्यांच्या उणीवा स्वीकारल्या तर आपल्याला त्यांच्याशी जुळून घेण्यात अडचणी येत नाही. त्याचवेळी, जर समोरच्यांचा उणीवा स्वीकारल्या नाहीत तर काहींसोबत तेवढी घट्ट मैत्री होत नाही. कालांतराने त्या नात्याची गरजही संपून जाते. सलमान पुढे म्हणाला, हळूहळू लोक त्यांच्या मार्गावर निघून. सुरुवातीला हा विचार खूप त्रास देतो. पण जेव्हा ते तुमच्या नजरेपासून दूर होतात तेव्हा ते कालांतराने मनातूनही दूर जायला लागतात. छोट्या- छोट्या गोष्टींमुळे अस्वस्थ होतो सलमान सलमानने यावेळी त्याच्या रागावर भाष्य केलं. सलमानने त्याला राग येत असल्याचं मान्य केलं. यासोबतच राग येणं गरजेचं असल्याचंही तो म्हणाला. त्याच्या मते राग येणं यात काही चुकीचं नाही. तसंच तो रागीट नसल्याचंही सलमान म्हणाला. कोणी उशीरा आलं किंवा चित्रीकरणाला उशीराने सुरुवात झाली अशा छोट्या- छोट्या गोष्टींमुळे तो अस्वस्थ होतो. तो इतरांना सतत सांगतो की भोवतालची परिस्थिती पाहा आणि समजून घ्या की तुम्ही किती नशिबवान आहात. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल नेहमीच कृतज्ञ असलं पाहिजे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33ycSF1