मुंबई- सतत शेतकरी आंदोलनावर भाष्य करत आहे. सोशल मीडियावर ती यासंबंधी ट्वीट करत असते. यापूर्वी कंगनाने या संदर्भात ट्वीट करत पंतप्रधान मोदींनाही टॅग केलं होतं. आता पंजाबचा प्रसिद्ध गायक जस्सीने कंगनावर पलटवार करत ट्वीट केलं आहे. विशेष म्हणजे त्याचं हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. कंगनाने केलं ट्वीट कंगनाने लिहिले की, मोदी जी किती स्पष्टीकरण देतील, किती वेळा समजावतील? शाहीन बागेत रक्ताचे पाट वाहणाऱ्यांनाही पूर्णपणे माहीत होतं की त्यांची नागरिकता कोणीही घेत नाहीए. पण तरीही त्यांनी दंगली करून देशात दहशत पसरवली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच पुरस्कार जिंकले. या देशाला धर्म आणि नैतिक मुल्यांची आवश्यकता आहे. म्हणाला की निर्लज्जपणाचीही काही मर्यादा असते 'जेव्हा मुंबई महापालिकेने तुझ्या घराचा एक कोपरा तोडला तेव्हा तू जग डोक्यावर घेतलं. इथे तर शेतकर्यांच्या जमिनींचा त्यांच्या आईचा प्रश्न आहे आणि ही बोलते की समजून घ्या.. जर तू शेतकर्यांच्या हक्काबद्दल बोलू शकत नाही तर किमान त्यांच्या विरोधात तरी बोलू नकोस. निर्लज्जपणाचीही एक मर्यादा असते.' कंगनाने दिलं जस्सीला उत्तर यावर कंगनानेही जस्सीला उत्तर दिलं. तिने ट्वीट करत म्हटलं की, 'जस्सी जी तुम्हाला इतका राग का येतोय. #FarmersBill2020 is a revolutionary bill, this will take farmers to new heights of empowerment. मी तर शेतकऱ्यांच्या अधिकाराबद्दल बोलत नाही. तुम्ही कोणाच्या अधिकाराबद्दल बोलत आहात माहीत नाही. 'शेतकरी स्वतःसाठी चांगला विचार करू शकतो' कंगना जी, ही कोणती क्रांती आहे जी शेतकऱ्यांना कळत नाहीए. फक्ती तुम्हाला आणि तुमच्या सरकारी ट्विटर ट्रॉल्सना समजत आहे? मी संपूर्ण विधेयक वाचलं आहे. यात शेतकऱ्यांची क्रांती नसून फक्त उद्योगजकांची आणि खासगी कंपन्यांची क्रांती होणार आहे. शेतकरी स्वतःसाठी चांगलं- वाईट विचार करू शकतो. तुम्ही त्यांचा विचार करू नका. फेक ट्वीटवरून ट्रोल झाली होती कंगना दरम्यान, कंगनाने या आंदोलनात भाग घेतलेल्या शेतकरी आजीबद्दल फेक ट्वीट केलं होतं. ही आज्जी १०० रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात जाते. मात्र नंतर तिने हे ट्वीट डिलीट केलं. मात्र, त्यावरून ती प्रचंड ट्रोल झाली होती. जस्सीनेही त्याविरोधात ट्वीट केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36w3Me6