Full Width(True/False)

'आरव'पासून 'आदिरा'पर्यंत, यूनिक आहेत नावं आणि त्याचा अर्थ

मुंबई- आजच्या युगात बॉलिवूड स्टारप्रमाणेच त्यांची मुलंही लाइम लाइटमध्ये जगतात. स्टार्सही त्यांच्या मुलांच्या जीवनशैलीची खूप काळजी घेत असतात. विशेषत: मुलांची नावं ठेवताना ते विशेष लक्ष देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच आठ स्टार किड्सच्या नावांचा अर्थ सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला माहितही नसेल. अली खान पतौडी सर्वात जास्त चर्चेत असलेला स्टार किड म्हणजे तैमूर अली खान. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा नेहमीच लाइम लाइटमध्ये असतो. तैमूरच्या नावावरही बराच वादंग निर्माण झाला होता. तैमूरलंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचं म्हटलं जातं. पण तैमूर या शब्दाचा दुसरा अर्थ शूर, बलवान, प्रसिद्ध राजा असाही होतो. शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा अब्राम याची चर्चाही काही कमी नाही. त्याचे फोटो बर्‍याचदा व्हायरल होत असतात. अब्रामचं नाव बायबलमधून आलं आहे. अब्राममधलं अब म्हणजे वडील. राम / रहम म्हणजे महान. याचा अर्थ महान वडील. रेहान आणि रिदान रोशन बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशनही यात मागे नाही. त्यानेही आपल्या मुलांना विशेष नावं दिली आहेत. हृतिक आणि सुझान खान यांना रेहान आणि रिदान ही दोन मुलं आहेत. रिदान नावाचा अर्थ मोठ्या मनाचा आणि रेहानचा अर्थ देवाने निवडलेला मुलगा असा आहे. आदिरा चोप्रा राणी मुखर्जी आणि यश चोप्रा यांना एक सुंदर मुलगी आहे. राणी आपल्या मुलीला प्रसार माध्यमांपासून शक्यतो लांबच ठेवते. राणीच्या मुलीचं नाव अदिरा आहे. हे नाव आदित्य आणि राणी यांची फोड करून बनवण्यात आलं आहे. आदित्यचं ‘आदि’ आणि राणीचं ‘रा’ हे शब्द घेऊन ‘आदिरा’ हे नाव तयार केलं गेलं आहे. रियान नेने माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना रियान आणि अरिन ही दोन मुलं आहेत. जो स्वर्गात जाण्याचा मार्ग उघडतो तो रियान असा मोठा मुलगा रियानच्या नावाचा अर्थ आहे. शहरान आणि इकारा दत्त संजय दत्त आणि मान्यता दोघांना शहरान आणि इकारा ही जुळी मुलं आहेत. शहरान म्हणजे 'शाही राजा' आणि इकारा म्हणजे शिक्षित करणारी व्यक्ती. भाटिया अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचा मुलगा आरव देखील लाइम लाईटपासून दूरच राहतो. अक्षयने विचारपूर्वक आपल्या मुलाचं नाव आरव ठेवलं आहे. या नावाचा अर्थ म्हणजे ज्ञानाचा राजा. युग आणि नीसा देवगण अजय देवगन आणि काजोलनेही आपल्या मुलांची नावं अतिशय विचारपूर्वक ठेवली आहेत. त्याच्या मुलाचं नाव युग आहे. तर मुलीचं नाव नीसा म्हणजे सरोवर, शक्तीचा एक प्रकार असं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fSfliC