मुंबई: मराठी नाटक, मालिका व चित्रपटांतील अनेक गीतांना स्वरसाज चढवणारे सुप्रसिद्ध संगीतकार यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. भिडे यांच्या निधनावर मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. अभिनेते , दिग्दर्शक यांनी एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. 'देवूळबंद , मुळशी पॅटर्न आणि आता सरसेनापती हंबीरराव .. संगीतकार - नरेंन्द्र भिडे .. माझा हक्काचा एकुलता एक संगीतकार गेला .. ऊन ऊन वठातून , आभाळा आभाळा , अरारारा खतरनाकऽऽऽऽऽ आता पुन्हा होणे नाही .. तीन वर्षांपूर्वी त्याला ज्या दिवशी चाल सुचली तो दिवस', अशा आशयाची पोस्ट प्रविण तरडे यांनी शेअर केली आहे. सिव्हिल इंजिनीयरची पदवी घेतलेल्या नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटके, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्सच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड, राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39ZydLU