नवी दिल्लीः HMD Global ने प्रसिद्ध नोकिया५ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. नॉर्डिक डिझाइनसोबत येणाऱ्या या फोनमध्ये ६ जीबी रॅम, रियर क्वॉड कॅमेरा सेटअप शिवाय जबरदस्त फीचर्स दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की, फोनमध्ये दिलेली बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवस बॅकअप देते. वाचाः नोकिया ५.४ च्या बेस व्हेरियंटची किंमत १८९ युरो म्हणजेच १६ हजार ९०० रुपये आहे. फोनला तीन व्हेरियंट म्हणजेच 4जीबी+64जीबी, 4जीबी+128जीबी आणि 6जीबी+64जीबी सोबत लाँच केले आहे. हा फोन डस्क आणि पोलर नाइट कलर ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनला भारतात कधीपर्यंत लाँच करण्यात येईल यासंबंधी कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः नोकिया ५.४ चे खास फीचर नोकिया ५.४ मध्ये ६.३९ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी प्रोसेसर दिला आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सेल्फी साठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये पॉवर देण्यासााठी 4000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, जीपीएस/A-GPS, यूएसबी टाइप-C आणि 3.5mm जॅक यासारखे ऑप्शन दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3863GJB
