Full Width(True/False)

लग्नाच्या वाढदिवसाला निक- प्रियांकाने शेअर केले Unseen Photos

लॉस एन्जेलिस- बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने बुधवारी तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला. १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी अमेरिकन गायक आणि अभिनेता निक जोनासशी प्रियांकाने हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. त्यांच्या या राजेशाही लग्नाची अनेक दिवस चर्चाही होती. लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसाला प्रियांकाने तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. प्रियांका चोप्राने तिच्या लग्नाचे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे तर साऱ्यांनाच माहीत आहे की प्रियांका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती तिच्या चाहत्यांसोबत खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातले अनेक गोष्टी शेअर करत असते. प्रियांकाने आता तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अगदी थोड्याच वेळात तिचे हे फोटो व्हायरलही झाले. अभिनेत्रीने लग्नाचे एकूण पाच फोटो शेअर केले. यात ती पती निक जोनससोबत फार आनंदी दिसत आहे. यात प्रियांकाने हिंदू विवाह सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. यात ती लाल लेहंग्यात दिसत आहेत. संपूर्ण विधींवेळी तिने निकचा हात आपल्या हातातच धरला आहे. शेवटच्या फोटोत प्रियांका निकच्या गळ्यात हार घालताना दिसत आहे. या फोटोत दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मित्र- मैत्रिणी दिसत आहेत. हे सर्व फोटो शेअर करताना प्रियांकाने निकला लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. निकनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे बरेच फोटो शेअर केले. प्रियांका आणि निक यांचे चाहतेही त्यांच्या फोटोंवर भरभरून लाइक आणि कमेन्ट करत आहेत. आणि यांनी जोधपूरमधील उम्मेद भवनमध्ये राजेशाही थाटात लग्न केलं होतं. लग्नाच्या विधींसाठी संपूर्ण पॅलेस चार दिवसांसाठी बुक केला होता. या चार दिवसांत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला आत प्रवेश करण्यास बंदी होती. प्रियांका आणि निकने दोन पद्धतीने १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39FrVAK