मुंबई- 'बिग बॉस ६' शिवाय अनेक रिअॅलिटी शो आणि सिनेमांमध्ये दिसलेल्या सना खानने वर्षभरापूर्वी अभिनय उद्योगाला निरोप दिला. एवढंच नाही तर गुजरातच्या एका मुफ्तीशी अचानक लग्न करून तिने सर्वांना आश्चर्यचकित केलं. पण आता खूप दुःखी असबव सोशल मीडियावर तिने यामागचं कारण सांगितलं आहे. त्याचं झालं असं की, सना खानबद्दल एका व्यक्तीने एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये तिचा भूतकाळ कसा होता ते दाखवलं. एवढंच नाही तर तिच्याबद्दल वाईटही बोलला. सनाला तो व्हिडिओ पाहून फार वाईट वाटलं. भूतकाळ मागे सोडलेला असतानाही अनेकजण पुनः पुन्हा तिला त्या सर्व गोष्टींची आठवण करून देतात याचं तिला वाईट वाटलं. याचसंबंधी तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. यात तिने स्पष्ट शब्दात लिहिलं की अशा नकारात्मक पोस्ट शेअर करून तुम्ही एखाद्याला नैराश्यात टाकत आहात. तसंच असं न करण्याची विनंतीही तिने यावेळी केली. सना खान म्हणाली- ते पाहून वाईट वाटलं सना सईद खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिलं की, 'काही लोक बर्याच काळापासून माझ्यावर नकारात्मक व्हिडिओ बनवत आहेत. आतापर्यंत मी गप्प बसले होते. पण आता एका व्यक्तीने माझ्यावर एक व्हिडिओ बनविला आहे. यात माझ्या भूतकाळावर भाष्य केलं आहे. तो माणूस माझ्याबद्दल वाईटही बोलत आहे. तुम्हाला हे माहीत नाहीए का की ज्या व्यक्तीने तौबा केला त्याला त्याच्या जुन्या गोष्टींबद्दल वारंवार सांगणं पाप आहे. हे सर्व पाहून मी दुखावले गेले आहे.' 'असं बोलून तुम्ही कोणालाही नैराश्य आणू नका' ही पोस्ट शेअर करताना सनाने लिहिले की, 'मला त्या व्यक्तीचं नाव सांगायचं नाही कारण त्याने जे केलं तेच मला करायचं नाही. ही वृत्ती फार वाईट आहे. जर तुम्ही एखाद्याला पाठिंबा देऊ शकत नाही तर किमान त्याच्याबद्दल वाईट तरी बोलू नका. शांत रहा. अशी वक्तव्य करून समोरच्याला नैराश्यात टाकू नका. कधीकधी तुम्ही पश्चात्ताप करता आणि पुढे जाता. पण माझ्यासारखेही काही असतात ज्यांना सतत वाटत असतं की मागे जाऊन गोष्टी नीट करता आल्या असत्या तर त्या केल्या असत्या. कृपया चांगले राहा आणि लोकांना वेळेनुसार बदलू द्या.' दरम्यान, सना खानने अभिनयाच्या आणि ग्लॅमरच्या जगाला निरोप दिल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी गुजरातच्या मुफ्ती अनस सईदशी लग्न केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ck9nYb