मुंबई: मराठी चित्रसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री हिला '' या लघुपटासाठी पूर्व युरोप आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळणारी रुचिता ही भारतातली पहिली अभिनेत्री ठरली आहे. नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कारानं मेहनतीचं फळ मिळाल्याचं रुचिता सांगते. रुचितानं अनेक मालिका तसंच चित्रपटात अभिनयाची झलक दाखवली आहे. 'लौट आओ त्रिशा', 'वीर शिवाजी', 'कालायः तस्मै नमः' या मालिका तसेच 'फेकमफाक', 'वात्सल्य' या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. पुरस्काराबद्दल रुचिका म्हणाली, 'हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठा असून याचं सर्व श्रेय मी माझ्या आईला देते. भूमिकेसाठी दिग्दर्शक अभय ठाकूर यांनी खूप मेहनत करून घेतली. त्यामुळे त्यांनाही या पुरस्काराचं श्रेय जातं.' या लघुपटात रुचिताला प्रसिद्ध अभिनेते यतीन कार्येकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pme1bP