पुणे टाइम्स टीम क्रिकेटप्रेमींना ‘’ या आगामी चित्रपटाची उत्सुकता आहे. भारतीय क्रिकेट संघानं पहिल्यांदा विश्वचषक पटकावला त्या १९८३ या खास वर्षाची आणि कर्णधार यांची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित होऊ शकला नाही. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगनं कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. फुटबॉल, शर्यत, बॉक्सिंग, बॅटमिंटन, स्नुकर, बुद्धीबळ या खेळावरचे चित्रपट पडद्यावर येत आहेत. खेळाडूंचे बायोपिक ते विविध खेळांवरचे चित्रपट असं वैविध्य या विषयांमध्ये दिसेल. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू साईना नेहवालच्या जीवनावर आधारित चित्रपटात अभिनेत्री परिणिती चोप्रानं तिची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बायोपिक डॉक्युमेंटरी असल्याचं दिग्दर्शक अमोल गुप्ते यांचं म्हणणं आहे. सध्या चित्रीकरण सुरू असणाऱ्या ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटात एका धावपटूची गोष्ट सांगितली जाणार आहे. यात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर आधारित ‘’ या चित्रपटातही तापसी मुख्य भूमिकेत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन आणि अजय देवगण हे अनुक्रमे ‘झुंड’ आणि ‘मैदान’ या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे दोन्ही चित्रपट फुटबॉलवर आधारित आहेत. अभिनेता शाहिद कपूर ‘जर्सी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. हा तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. त्याची कथा क्रिकेटभोवती फिरते. खेळांवर बेतलेल्या या चित्रपटांना रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. प्रामुख्यानं खेळ पडद्यावर आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ या चित्रपटाच्या निमित्तानं खेळावर आधारित चित्रपटाला यश मिळालं. त्यावेळी भारतातच नाही; तर जगभरात हा चित्रपट नावाजला गेला. त्यानंतर विविध खेळांवर आधारित चित्रपटांची मालिकाच सुरू झाली. ‘इक्बाल’, ‘चक दे इंडिया’, ‘पान सिंग तोमर’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरी कोम’ आणि ‘दंगल’ असे अनेक चित्रपट आले. ते बॉक्स ऑफिसवर गाजलेही. काही महिन्यांपूर्वी ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या माध्यमातून क्रिकेटविश्वातल्या अनोख्या फँटसीवर प्रकाश टाकण्यात आला. ‘सांड की आँख' हा चित्रपट नेमबाज चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर बेतलेला होता. खेळावर आधारित आगामी चित्रपट- ८३ ः रणवीर सिंग ः क्रिकेट - जर्सी ः शाहिद कपूर ः क्रिकेट - मैदान ः अजय देवगण ः फुटबॉल - रश्मी रॉकेट ः तापसी पन्नू ः शर्यत - झुंड ः अमिताभ बच्चन ः फुटबॉल - साईना ः परिणिती चोप्रा ः बॅडमिंटन - तुफान ः फरहान अख्तर ः बॉक्सिंग - शाब्बास मिथू ः तापसी पन्नू ः क्रिकेट - तुलसीदास ज्युनियर ः संजय दत्त ः स्नुकर - विश्वनाथन आनंद चरित्रपट ः आनंद एल. राय दिग्दर्शित ः बुद्धिबळ
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3c5mEng