मुंबई- वेब सीरिजवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मिर्झापूर पोलिसांनी बुधवारी मुंबई गाठली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी यूपी पोलीस गुरुवारी या वेब सीरिजचा कार्यकारी निर्माता फरहान अख्तरच्या घरी पोहोचले. पण अभिनेत्याशी कोणतीही चर्चा होण्यापूर्वीच त्यांना घरातून निघून जाण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे. अधिकृत नियमांनुसार, कोणत्याही खटल्याच्या तपासणीसाठी इतर कोणत्याही राज्यातून मुंबईत आलेल्या पोलिसांना तेथील नोडल ऑफिसर (गुन्हे शाखा डीसीपी) ची परवानगी घ्यावी लागते. मुंबईत दाखल झाल्यानंतर डीसीपी अकबर पठाण यांच्या कार्यालयात गेले. परंतु त्यांची भेटू होऊ शकली नाही. याचमुळे, या खटल्यासाठी त्यांना पुढील परवानगी मिळू शकली नाही. गुरुवारीही मुंबई पोलीस अंधेरी येथील गुन्हे शाखा, डीसीपी यांच्या कार्यालयात गेली होते, परंतु तेथेही त्यांची भेट झाली नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर ही टीम चौकशीसाठी खार येथील फरहान अख्तरच्या घरी पोहोचली. यानंतर लगेच मुंबई पोलिसांना कळविण्यात आले आणि स्थानिक पोलीस, खार येथील फरहानच्या घरी पोहोचले. चौकशीसाठीचे नियम न पाळण्याचं कारण सांगून फरहानने पोलिसांशी कोणताही संवाद साधण्यास नकार दिला. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील मिर्झापूर या वेब सीरिजमध्ये दाखविल्या गेलेल्या आशयामुळे मिर्झापूर जिल्ह्याची देशात बदनामी झाली असं सांगत अरविंद चतुर्वेदी यांनी सीरिजचे निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत अॅमझॉन प्राइम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मिर्झापूर या वेब सीरिजमुळे जिल्ह्यातील धार्मिक, सामाजिक आणि प्रादेशिक भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढंच नाही तर मिर्झापूरची चुकीची माहिती देण्याचं कामही केलं गेलं असल्याचं त्यांनी या आरोपात म्हटलं आहे. तक्रारीच्या आधारे, अॅमजॉन प्राइमसह मिर्झापूर वेब सीरिजचे निर्माते- दिग्दर्शक रितेश साधवानी, आणि भौमिक गोंदलिया यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहितांगर्त २९५- अ, ५०४, ५०५, ३४, ६७अ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y5TQ5O