Full Width(True/False)

भजन गायक नरेंद्र चंचल यांचं निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली- प्रख्यात भजन गायक यांचे गुरुवारी २२ जानेवारी रोजी दिल्लीत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. मीडिया रिपोर्टनुसार ते मागील तीन महिन्यांपासून आजारी होते. उपचारांदरम्यान त्यांनी दिल्लीतील अपोलो इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाण्यांना दिला आवाज नरेंद्र चंचल हे भजन गाण्यासाठी विशेष प्रसिद्ध होते. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाण्यांना आवाज दिला आहे. नरेंद्र चंचल यांना सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. 'बॉबी' सिनेमातून केली बॉलिवूडमध्ये गाण्याची सुरुवात नरेंद्र चंचल यांचा जन्म अमृतसरमध्ये झाला. त्यांनी १९७३ मध्ये ऋषी कपूर यांच्या 'बॉबी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये गायकीमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर त्यांनी 'बेनाम', 'रोटी कपडा और मकान' आणि 'अवतार' यांसारख्या सिनेमांमध्ये गाणी गायली. ही त्यांची गाणी तेव्हा चांगलीच गाजली होती. यानंतर त्यांनी आपल्या भजनांनी बरंच नाव कमावलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Nhq77R