Full Width(True/False)

रणवीर सिंग म्हणतो...असं काही घडेल असा कधी विचारच केला नव्हता!

कधी काळी आपण मोठे स्टार बनू, असं नुसतं स्वप्नही न पाहिलेला अभिनेता आता बॉलिवूडचा सुपरस्टार बनलाय. त्याच्या सिनेविश्वातील करिअरला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं, करिअरची सुरुवात, मधले मोठे टप्पे, स्वत:मध्ये झालेले बदल, त्याची स्वप्न या सगळ्यांविषयी तो व्यक्त झालाय. मुंबई टाइम्स टीम दहा वर्षांच्या करिअरच्य़ा प्रवासात सर्वात मोठे टप्पे कोणते होते? - माझ्या पहिल्या चित्रपटाची निवड हाच माझ्यासाठी सगळ्यात मोठा टप्पा होता. त्यानंतर प्रत्येक चित्रपटाच्या वेळी कलेविषयी, स्वत:विषयी काहीतरी नवीन शिकायला मिळत गेलं. प्रत्येक व्यक्तिरेखेतून मी स्वत:चा शोध घेऊ लागलो. स्वत:ला चांगल्या पद्धतीनं समजू लागलो. प्रत्येक अनुभवानं, चित्रपटानं मला समृद्ध केलंय. मिळालेल्या प्रत्येक संधीसाठी मी कृतज्ञ आहे. ० इथवर पोहोचताना तुलाही बराच संघर्ष करावा लागलाय. त्याविषयी सांग. - माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक मंदी सुरू होती. चित्रपट व्यवसायाला तेजी नव्हती. त्यामुळे आजच्या तुलनेत कमी संधी होत्या. ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते. जवळपास तीन-साडेतीन वर्षं मी चाचपडत होतो. कामासाठी माझा पोर्टफोलिओ घेऊन वेगवेगळ्या ऑफिसमध्ये जायचो. पण, पुढे काय घडणार आहे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. हिंदी चित्रपटात मला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळेल असा साधा विचार करणंही आवाक्याबाहेरचं होतं. २१ व्या वर्षी मी प्रयत्नांना सुरुवात केली आणि वयाच्या २४ व्या वर्षी खऱ्या अर्थानं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली. ० एका दशकात आपल्याला एवढं मोठं यश मिळेल असं तुला कधी वाटलं होतं का? - अजिबात नाही. पदार्पण झालेल्या शुक्रवारपासून ज्या-ज्या गोष्टी अनुभवल्या, ते सर्व काही माझ्या कल्पनेपलीकडचं आहे. 'काही ना काहीतरी घडेल' असं वाटायचं. पण, एवढं काही घडेल असा कधी विचारच केला नव्हता. असं म्हणतात की, मोठी स्वप्नं बघावी. पण, मी एवढं मोठं स्वप्न पाहण्याची कधी हिंमतच केली नव्हती. ० तुझ्या पदार्पणाचा चित्रपट आणि अलीकडचा चित्रपट यामध्ये तुला तुझ्यात कोणतं साम्य आणि बदल जाणवतो? - 'बँड बाजा बारात' या माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळी त्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल मला काहीही माहिती नव्हती. आता दहा वर्षांनंतर 'जयेशभाई जोरदार' हा माझा अलीकडे चित्रीत केलेला सिनेमा. हा चित्रपट बघताना एक अभिनेता म्हणून मी अधिक सशक्त झालोय असं वाटू लागलं. करिअरचा प्रवास बघता अभिनयासह माझ्या विविध क्षमतांमध्ये लक्षणीय बदल झालाय. मी स्वत:ला नेहमीच विद्यार्थी समजतो. अधिकाधिक ज्ञान, कौशल्य आणि अनुभव मिळवण्याची धडपड करताना मी स्वत:ला एक व्यावसायिक अभिनेता म्हणून घडवू पाहतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35qUbUJ