Full Width(True/False)

...म्हणून अभिज्ञानं सोडली होती एयर होस्टेसची नोकरी; जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

मुंबई: 'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नुकतीच विवाहबंधानात अडकली असून तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. याच्यासोबत अभिज्ञा लग्नबंधनात अडकली असून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मालिकां आणि तिच्या ग्लॅमरस लुकमुळे अभिज्ञा नेहमीच चर्चेत असते. परंतु तिच्याबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला माहित नसतील. खरं तर सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अभिज्ञा एयर होस्टेस होती हे तर सर्वांनाच माहित आहे, पण यापूर्वी तिचं लग्न झाल्याचं खूपच कमी जणांना माहित आहे. २०१४ साली अभिज्ञा वरुण वैटिकरसोबत विवाहबंधनात अडकली होती. मात्र, काही कारणांमुळं त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुन्हा प्रेमातअभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. १५ वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखायचे. मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. काही दिवसांनी हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही त्यांच्या नात्याला लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली'मटा श्रावणक्वीन' स्पर्धेत उतरण्याआधी मी फक्त एक एअरहोस्टेस होते. मला या क्षेत्रात यायचं होतं पण कुठून सुरूवात करावी हे माहिती नव्हतं. मला एका सेफ प्लॅटफॉर्मवरून इण्डस्ट्रीत पदार्पण करायचं होतं आणि तो मला 'महाराष्ट्र टाइम्स'ने दिला', अभिज्ञा भावे सांगते. पहिलं प्रेमअभिनेत्री होण्याआधी अभिज्ञानं हवाईसुंदरी म्हणून काम केलं आहे. अभिनेत्री आणि हवाईसुंदरी, यातलं तुझं पहिलं प्रेम कोणतं? या प्रश्नाचं उत्तर देताना अभिज्ञा म्हणते की, 'आयुष्यात पहिल्यांदा केलेल्या गोष्टीला आपल्या मनात नेहमीच एक खास स्थान असतं. हवाईसुंदरी म्हणून नोकरी करतानाचा प्रवास मला बरंच काही शिकवून गेला. आपण पाहिलेलं एखादं स्वप्न जेव्हा आपण जिद्दीनं पूर्ण करतो, तेव्हा ते स्वप्न नेहमीच आपल्यासाठी पहिलं प्रेम असतं.' उद्योजिकाअभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोघींनी मिळून सुरू केलेल्या 'तेजाज्ञा' प्रसिद्ध झाला आहे. 'मी आणि तेजस्विनी मैत्रिणी. एकदा आम्ही दोघी एकत्र असताना असाच विषय निघाला, की आम्ही ठरवलं की काहीतरी करू या. त्यातून अगदी योगायोगानं 'तेजाज्ञा' हा व्यवसाय आमचा सुरू झाला. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कामामध्ये वेगळेपण हवं असतं. तशाच इच्छेतून 'तेजाज्ञा' हा व्यवसाय कोणतंही प्लॅनिंग वगैरे न करता सुरू झाला आहे. आपापलं शूटिंग आणि 'तेजाज्ञा' या दोन्ही गोष्टी एकत्र नीट सांभाळता याव्यात म्हणून आम्ही महिन्यातले दिवस ठरवून घेतले आहेत. त्यातून दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधत आम्ही काम करत असतो', असं अभिज्ञा सांगते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ibcLFT