मुंबई: अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याचे अभियान सुरू झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी देणगी दिली आहे. अभिनेता यानंही व्हिडिओ शेअर करत देणगी देण्याचं आवाहान केलं होतं. आता या यादीत अनेक सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश झाला आहे. अक्षय कुमारअक्षय कुमारनं त्यानं दिलेल्या देणगीची रक्कम सांगितली नसली तरी राम मंदिराच्या कामाला हातभार लावण्याची जबाबदारी आपलीच असल्याचं त्यानं म्हटलं आहे. टीव्ही मालिकेत यांची भूमिका साकारलेला अभिनेता गुरमीत चौधरी यानं देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो चाहत्यांना मंदिरासाठी दान करण्याचं आवाहान करत आहे. 'मी आज इथपर्यं पोहोचलो आहे तो, श्री राम यांच्यामुळंच. त्यांचे मी आभार मानतो. कारण माझी पहिली मालिका ही रामायण होती आणि यासाठी स्वत:ला नशिबवान समजतो',असं त्यानं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर यानं देखील उभारण्यासाठी तब्बल एक कोटींची देणगी दिली आहे. शेवटी एक जुना मुद्दा आता संपला आहे. यामुळं एकता आणि शांतीचा मार्ग खुला होणार आहे. मी आणि माझ्या कुटुंबानं एक छोटंसं योगदान या कार्यात दिलं आहे', असं गौतमनं म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3p4azCu