Full Width(True/False)

रेडमीचा 'हा' स्मार्टफोन ३७ तासांपर्यंत चालणार, लाँचआधी कंपनीचा दावा

नवी दिल्लीः रेडमीच्या या स्मार्टफोनची लाँचिंग आधीच जोरदार चर्चा सुरू आहे. रेडमीचे जनरल मॅनेजर ल्यू विबिंग यांनी या फोनच्या बॅटरीसंबंधी एक माहिती दिली आहे. फोनची बॅटरी सिंगल चार्जवर एका दिवसांहून जास्त चालणार आहे. स्क्रीनशॉटवरून ही माहिती उघड झाली आहे. रेडमीच्या या फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. Redmi K40 सोबत सुपीरियर रेडमी के ४० प्रो सुद्धा लाँच करु शकते. दोन्ही फोनमध्ये होल पंच डिस्प्ले आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर मिळू शकतो. वाचाः विबो वर ल्यू विबिंग कडून शेयर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, १०.५ तासांच्या वापरानंतर रेडमी के ४० ची बॅटरी ६५ टक्के शिल्लक आहे. विबिंगने फोनचा वापराबद्दल कोणतीही माहिती शेयर केली नाही. रेडमी के ४० स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधी कोणतीही माहिती शेयर करण्यात आली नाही. परंतु, स्क्रीनशॉटवरून हे उघड झाले आहे की, ६४ शिल्लक बॅटरीला २५ तासांहून जास्त वापरता येऊ शकते. म्हणजेच फोनची बॅटरी एकूण ३७ तासांपर्यंत चालण्याचा दावा करण्यात आला आहे. वाचाः विबिंग कडून शेयर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉटवरून हेही उघड झाले आहे की, रेडमी के ४० फुल एचडी प्लस रिझॉलव्यूशन डिस्प्ले सोबत येणार आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशियो २०.९ आहे. याआधी याच महिन्यात रेडमीच्या प्रोडक्ट डायरेक्टर वेंग टेंग थॉमस यांनी सांगितले की, रेडमी के ४० सीरीजमध्ये एकापेक्षा एक फोन येणार आहेत. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर असणार आहे. रेडमी के ४० प्रो मध्ये पंचहोल डिस्प्ले डिझाईन दिली जाऊ शकते. विबिंगने घोषणा केली होती की, रेडमी के ४० ला पुढील महिन्यात लाँच करण्यात येणार आहे. नवीन फोन्सची सुरुवातीची किंमत २९९९ युआन म्हणजेच ३३ हजार ८०० रुपये असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3oZDlUL